चिमूर : चिमूर येथील नगर परिषद रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी रोजंदारी कर्मचारी व शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.
जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. चिमूर ग्रामपंचायतचे रूपांतर चिमूर नगर परिषदमध्ये झाले असून ग्रामपंचायत काळापासूनच सफाई मजूर रोजंदारीने काम करीत आहेत, नगर परिषदने वेतनवाढीसंदर्भात ठराव पास करुनही अद्याप वेतनवाढ दिली नाही. २० वर्षांपासून रोजंदारीवर काम करीत असतानादेखील नगर परिषदमधे नियमित कर्मचारी म्हणून सामावून घेतले नाही. त्यामुळे नियमित सेवेत असलेले सर्व रोजंदारी कर्मचारी आर्थिक संकटात आहेत. भविष्यात जर नियमित कर्मचारी म्हणून सामावून घेतले नाही तर मजुरांचे भविष्य अंधारमय होईल, या आशयाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
यावेळी माजी तालुकाप्रमुख भाऊराव ठोंबरे, नाना नंदनवार, सुधाकर निवटे, श्रीहरी सातपुते, किशोर उकुंडे, विनायक मुंगले, आशिष बगुलकर, विलास कानझोडे, भाऊराव गोहने, राम जांभूळकर, शिवाजी मेश्राम, सिद्धार्थ चहांदे, भीमराव रामटेके, पारस देवगडे, राकेश बगुलकर आदी उपस्थित होते.