उद्घाटन जीएसटी तथा विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय मुंबईचे उपायुक्त किरण गावतुरे, अध्यक्षस्थानी सिंदेवाहीचे माळी समाज अध्यक्ष प्रा. पवन गुरनुले होते. प्रमुख अतिथी म्हणून इनफिंस्टन शासकीय महाविद्यालय, मुंबईच्या प्रा. प्रीती गावतुरे, संत सावता माळी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नकटूजी सोनुले, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, अध्यक्ष के. बी. मांडवकर, प्रा. धनंजय वाढई, एल. पी. भेंडारे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रा. संजय नाथे पब्लिकेशनच्या माध्यमातून अभ्यासिकेला पुस्तकांची भेट देण्यात आली. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. नकटूजी सोनुले यांनी प्रास्ताविक केली. संजय मोहूर्ले यांनी सूत्रसंचालन केले. अनिल लोनबले यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी संजय भेंडारे, सुधीर ठाकरे, सुनील गुरनुले, वंदना सोनुले, मेघा निकोडे, प्रभाकर आदे, गजानन आदे, जगदीश मोहुले, श्रीदिनेश वाढई, आकाश शेंडे, वैभव बोरुले, संदीप आदे यांनी सहकार्य केले.
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभ्यासिकेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:34 IST