लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जेसीआय चंद्रपूर ईलाइट संस्थेचा सन २०२०-२१चा १२ वा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. जेसीआय चंद्रपूर ईलाइट संस्थेचे अध्यक्ष म्हणून आनंद मुंधडा तर सचिवपदी अनुप काबरा यांची निवड करण्यात आली. जेसीआयचे माजी अध्यक्ष प्रतीक सारडा व सचिव रुपेश राठी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडे पदभार दिला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मनपा आयुक्त राजेश मोहिते तसेच जेसीआय १३ झोनचे उपाध्यक्ष शिवराज टेकाडे, मेघानाथ जानी उपस्थित होते. चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते म्हणाले, चंद्रपूरच्या नागरिकांसाठी जेसीआय संस्था आणि चंद्रपूर महानगरपालिका मिळून अनेक सकारात्मक प्रकल्प घेऊ शकतात. जलसंवर्धन, जैविक खत, वृक्षारोपण यासारखे अनेक प्रकल्प जेसीआय संस्था राबवू शकते, असा आशावाद व्यक्त केला. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जेसीआय शाखा १३ चे अध्यक्ष अनुप गांधी यांनी येणाऱ्या वर्षाची रूपरेखा मांडली. चंद्रपूरच्या युवांची जेसीआय ईलाइट संस्थेत अधिकृत नोंदणी करण्यात आली. त्यानंतर सर्व नवीन सदस्यांचे शपथ ग्रहण करण्यात आले. गतवर्षी उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाला डॉ. सुशील मुंधडा, श्याम धोपटे, उमेश चांडक, माजी झोन अध्यक्ष भारत बजाज उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष पोद्दार, स्नेहल काबरा, मयुरी पोद्दार यांनी केले तर अनुप काबरा यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रेयस सुराणा, रूपेश राठी, गौरव लाहोटी, पार्थ कांचर्लावार, ज्ञानेश कांचर्लावार, सुशांत नक्षिणे, ऋषिकांत जाखोटिया, बिपीन भट्टड, डॉ. आशिष गजबे, पंकज मुंद्रा, नितेश चांडक, अभिलाष बुक्कावार, अश्विन सारडा, पंकज सारडा, पियुष माहेश्वरी, राहुल जैन, योगेश तोष्णीवाल, राजेश नायर, अक्षय जानवे, ॲड. आशिष मुंधडा आदींनी प्रयत्न केले.