शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा व विधानसभेच्या धामधुमीत ग्रा. पं.च्या निवडणुकीचाच विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 14:00 IST

ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती : पदाधिकारी नसल्याने गावात समस्या

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत निवडणूक आयोगास ग्रामपंचायतीच्या निवडणुकींचाही विसर पडला. प्रकाराने नागभीड तालुक्यातील आठ ग्रामपंचायती निवडणुकीविना आहेत. परिणामी, या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. आता प्रशासन विधानसभा निवडणुकीच्या कामास लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात नागभीड तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची मुदत संपायला आली होती. 

यात नवेगाव पांडव, उश्राळ मेंढा, गंगासागर हेटी आणि खडकी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. वास्तविक, जानेवारी महिन्यातच या ग्रामपंचायतींच्या निवडणुका व्हायला हव्या होत्या. मात्र, प्रशासन लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने प्रशासनाकडून या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात आल्या नाही. मुदत संपल्याने या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

तर येनोली माल, सोनापूर तुकूम, वासाळा मेंढा आणि किटाळी मेंढा या ग्रामपंचायतींची मुदत नुकतीच ऑगस्ट २०२४ मध्ये संपली. या ग्रामपंचायतींची मुदत संपत होती, तेव्हा प्रशासन विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले. त्यामुळे प्रशासन या गावातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यास असमर्थ ठरले. 

उत्साहावर पाणी निवडणुकांना घेऊन या आठही गावांतील चावडीवर गप्पांचे फड रंगायला लागले होते. गावात उमेदवारांचे पॅनल तयार करण्याच्या हालचालीही सुरु झाल्या होत्या. मात्र, निवडणुका घेण्यात न आल्याने उमेदवार व नागरिकांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले आहे. यावेळेस येथील सरपंचांची निवड थेट पद्धतीनेच या होणार आहे. यादृष्टीने गावातील राजकीय पक्षांचे प्रमुख यांच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. मात्र, आता या निवडणुका विधानसभेच्या निवडणुकीनंतरच होतील, असे गृहीत धरून चर्चा आणि हालचालींना इच्छुकांकडून पूर्णविराम देण्यात आला आहे

स्वराज्य संस्थांच्या इच्छुकांनी संपर्क वाढविला गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही 'वेटिंगवर आहेत. या स्वराज्य संस्थांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवारासोबत आपलाही प्रचार करून घेतला. आता विधानसभा निवडणुकीत त्यांचा हाच प्रयत्न आहे.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरgram panchayatग्राम पंचायत