शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४५५ महिलांनी गमावले कुंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 05:00 IST

कोविडमुळे एकल झालेल्या महिलांना त्वरित लाभ द्या, असे सांगून पांडे म्हणाल्या, ८ ते १० दिवसात ही प्रकरणे निकाली काढा. त्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळासंदर्भात १० सदस्यांच्या वर उपस्थिती असलेल्या सर्व आस्थापनांनी तत्काळ महिला तक्रार निवारण समिती स्थापन करावी, असेही त्या म्हणाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोविडमुळे जिल्ह्यातील ४५५ महिलांनी आपले कुंकू गमावले आहे. कुटुंबाचा डोलारा, मुला-मुलींचे शिक्षण आदी समस्यांचा डोंगर त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. या महिलांना दिलासा देण्यासाठी त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे अशी प्रकरणे प्रलंबित असतील तर सर्व विभागांनी ती तत्काळ निकाली काढून संबंधित कुटुंबाला लाभ द्यावा, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी यंत्रणेला दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात महिला प्रकरणांचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, पोलीस उपअधीक्षक (गृह) राधिका फडके, महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, महिला आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वयक उगेमुगे, महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संग्राम शिंदे आदी उपस्थित होते.कोविडमुळे एकल झालेल्या महिलांना त्वरित लाभ द्या, असे सांगून पांडे म्हणाल्या, ८ ते १० दिवसात ही प्रकरणे निकाली काढा. त्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळासंदर्भात १० सदस्यांच्या वर उपस्थिती असलेल्या सर्व आस्थापनांनी तत्काळ महिला तक्रार निवारण समिती स्थापन करावी, असेही त्या म्हणाल्या.या बैठकीला कारागृह अधीक्षक वैभव आगे, महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक वनिता घुमे, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी वनिता गर्गेलवार, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, दीपेंद्र लोखंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या केल्या सूचना- तालुकास्तरावर महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्याचे नियोजन करावे. पोलीस ठाण्यामध्ये विविध कारणांनी तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांची तक्रार तत्काळ नोंदवा. भरोसा सेलमध्ये समुपदेशकांची पदे वाढविणे गरजेचे आहे. अवैध धंदे, दारूची दुकाने असलेल्या शेजारच्या वस्तीमध्ये दामिनी पथकाने आपली गस्त वाढवावी. अशाठिकाणी महिलांना त्रास देण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे गैरवर्तणूक करणाऱ्या नागरिकांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करावी. शहरात कार्यरत स्वाधारगृहातील महिलांच्या संरक्षणासाठी पोलीस शिपायाची नियुक्ती करावी, आदी सूचना त्यांनी केल्या.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू