शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आम्हच्या वाट्याचे अन्नधान्य गरीबांना द्या; बल्लारपुरात अन्नधान्य योजनेतून 'ते' पडले बाहेर

By साईनाथ कुचनकार | Updated: September 7, 2022 16:56 IST

चंद्रपूरनंतर, बल्लारपूर तालुक्यातील काही नागरिक स्वमर्जीने अन्नधान्य योजनेतून बाहेर पडले आहेत.

चंद्रपूर :अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रेशनवर धान्य दिले जाते. मात्र अनेकवेळा गरज नसतानाही लाभार्थी धान्य उचलतात. त्यामुळे ज्यांना धान्याची गरज असते. अशा लाभार्थ्यांना वंचित रहावे लागते. त्यामुळे ज्यांना धान्याची गरज नाही, अशा लाभार्थ्यांनी अन्नधान्य योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन अन्नधान्य पुरवठा विभागाने केले होते.

या आवाहनानंतर चंद्रपूरनंतर, बल्लारपूर तालुक्यातील काही नागरिक स्वमर्जीने या योजनेतून बाहेर पडले आहेत.यासंदर्भातील अर्ज त्यांनी तहसीलदार डाॅ. कांचन जगताप, अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी भारत तुंबडे यांच्याकडे सुपूर्द केला. यांच्यासह अन्य नागरिकांनी योजनेतून बाहेर पडण्याची आवाहन करण्यात आले आहे. पुरवठा विभागाने केलेल्या आवाहनानुसार दहेली येथील विलास बोबडे दहेली, बल्लारपूर रतन सिंग बुंदेल यांनी स्वमर्जीने योजनेतून बाहेर पडत आपल्या वाट्यातील धान्य गरजू लाभार्थ्यांना देण्याची विनंती केली आहे.गरज नसेल तर योजना सोडावी 

ज्या नागरिकांना स्वस्त धान्य नको आहे, अशा नागरिकांनी पुरवठा विभागाकडे किंवा रेशन दुकानदारांकडे अर्ज भरून रेशनवरील धान्य नाकारता येते. यामुळे समाजातील गरिब तसेच गरजु नागरिकांना हे धान्य देता येणार आहे. अन्नधान्य योजनेतून बाहेर पडा योजनेमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.रेशन दुकानात करा अर्ज 

अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गट, अंत्योदय योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धान्य दिल्या जाते. कोरोना संकटापासून गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य वितरण केल्या जात आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना धान्याची खरोखर गरजनाही. त्या लाभार्थ्यांनी रेशनवरील मिळणारे धान्य नाकारले पाहिजे. यामुळे गरीब तसेच गरजूंना लाभ मिळू शकतो. यासाठी संबंधित रेशन दुकानदार, पुरवठा विभागाकडे अर्ज करावा लागतो.अन्नधान्य योजनेतून बाहेर पडा योजनेद्वारे ज्या नागरिकांना अन्नधान्याची गरज नाही. अशा नागरिकांनी रेशनवरील धान्य उचलू नये, त्यांनी योजनेतून बाहेर पडावे,ज्या नागरिकांचे आर्थिक उत्पन्न कमी आहे, उदरनिर्वाह करणे कठीण आहे, अशांना रेशनवरील धान्य मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली असणाऱ्या नागरिकांनी हे धान्य नाकारले पाहिजे. 

- डाॅ. कांचन जगताप, तहसीलदार, बल्लारपूर

टॅग्स :Socialसामाजिकballarpur-acबल्लारपूरfoodअन्न