शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:27 IST

शहरातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला. सध्या सुरू असलेल्या सुविधांमध्ये वाढ करून गुणात्मक दर्जा वाढविण्यात येईल, अशी माहिती मनपा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांनी दिली.

ठळक मुद्देआरोग्य सुविधांमध्ये वाढ : स्थायी समिती सभापतीकडून केंद्राची पाहणी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शहरातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला. सध्या सुरू असलेल्या सुविधांमध्ये वाढ करून गुणात्मक दर्जा वाढविण्यात येईल, अशी माहिती मनपा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांनी दिली.मनपा आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी जबाबदारीने कार्ये करीत आहेत. पण त्यांच्या कार्याला गती नसल्याने शहरातील सर्व आरोग्य केंद्रांची पाहणी करण्याची मोहीम राबविण्यात आली. शासकीय आरोग्य केंद्रातही खासगी आरोग्य केंद्राइतक्याच दर्जेदार सुविधा मिळतात, याची माहिती शहरातील नागरिकांना दिली जात आहे. शहरातील मूल रोड रामनगर, बालाजी वॉर्ड, बगड खिडकी, बाबूपेठ, सुपर मार्केट भिवापूर, इंडस्ट्रियल इस्टेट वॉर्ड येथील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना सभापती पावडे यांनी भेट दिली. कर्मचाºयांच्या समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी झोन क्र. १ चे सभापती देवानंद वाढई, वसंत देशमुख, नगरसेविका आशा आबोजवार, छबु वैरागडे, संगीता खांडेकर, ज्योती गेडाम, निलम आकेवार, कल्पना बगूलकर, मंगला सोयाम, नगरसेवक राहुल घोटेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, डॉ. नरेंद्र जनबंधू, डॉ. जयश्री वाडे, डॉ. अश्वीनी भारत, डॉ. कीर्ती राजूरवार, डॉ. अलका आकुलवार, डॉ. गर्गेलवार, डॉ. विजय खेरा, डॉ. नयना उत्तरवार, नागोसे, सिद्दीकी अहेमद व जनसंपर्क अधिकारी युधिष्ठीर रैच आदी उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. आंबटकर यांनी आरोग्य केंद्राद्वारे दिले जाणाºया सुविधांची माहिती सादर केली. तसेच सेवा देताना येणाºया अडचणींकडेही त्यांनी लक्ष वेधले. ५० हजार लोकसंख्येला एक केंद्र यानुसार एकूण सात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहेत. मनपाच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे शहरात दर महिन्याला ७० लसीकरण शिबिर घेतले जातात. वैद्यकीय अधिकारी तसेच अन्य तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे आठवड्यातून एकदा रुग्णांची तपासणी केली जात आहे. शासनाच्या योजना कागदोपत्री राहू नये, यासाठी आरोग्य केंद्रातील सर्व माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सध्या जोमाने सुरू आहे. यासाठी नगरसेवकांच्या बैठका घेतल्या जात आहे. लोकप्रतिनिधींनी प्रभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देवून सुधारणा सुचविणे व समस्यांच्या निराकरणासाठी पाठपुरावा करावा, अशी सूचना सभापती पावडे यांनी दिली.आरोग्य केंद्राचे बांधकाम व नुतनीकरण इत्यादी कामांसाठी विशेष अभियंत्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नवीन केंद्रासाठी मनपाच्या हक्काच्या जागा उपलब्ध व्हावे, या हेतूने पाठपुरावा सुरू आहे. शहरातील विविध वॉर्डांत कार्यरत असणाºया आशा सेविकांसाठी मनपाकडून गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. प्रयोगशाळा व काही वॉर्डांत बोअरवेल बांधकामाचा विचार सुरू असल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली. यावेळी मनपाचे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.