शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

हेल्मेट सक्तीपूर्वी शहरातील वाहतूक सुधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:56 IST

शहरातील खड्ड्यांमुळे एक महिला व एका मुलीचा बळी गेला. या दोन घटनांमुळे चंद्रपुरात हेल्मेट सक्ती करण्यात आली. परंतु हेल्मेट सक्ती करण्यापूर्वी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देचंद्रपुरातील नागरिकांचा सूर : कारवाईच्या भीतीपोटी हेल्मेटची खरेदी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील खड्ड्यांमुळे एक महिला व एका मुलीचा बळी गेला. या दोन घटनांमुळे चंद्रपुरात हेल्मेट सक्ती करण्यात आली. परंतु हेल्मेट सक्ती करण्यापूर्वी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारणे आवश्यक आहे. शहरात सर्वत्र वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आला असून रस्त्याने पायी चालणाऱ्यांना, सायकल चालविणाऱ्यांना आणि नियमानुसार दुचाकी वाहन चालविणाऱ्यांना चालणे, फिरणे, वाहने चालविणे, कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हेल्मेट सक्ती शिथिल करावी, असा सूर आता चंद्रपूर शहरवासीयांत उमटत आहे.चंद्रपूर शहरात कुठेही २० ते ३० किमी प्रती तासाच्या वेगात वाहने धावताना दिसत नाही. सर्वत्र बेधुंदपणे वाहन चालविले जात असून ओव्हटेक करणे आणि ओव्हरटेक करण्याकरिता हॉर्न वाजविणे, पे्रशन हॉर्न, कर्कश हॉर्न वाजविण्याचे प्रकार सुरू आहेत. शहरातील रस्ते लहान आहेत. त्यामानाने लोकसंख्या वाढलेली आहे. वाहनांची संख्या हजार पटीने वाढलेली आहे. मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला चारचाकी वाहने उभे केलेले असतात. त्यामुळे शहरातून जाताना ओव्हरेटक करण्याकरिता जागाच नसते. तरीही बेधुंदपणे ओव्हरटेक करणे आणि ओव्हरटेक करण्याकरिता हॉर्न वाजविले जाते.शहरात सर्वत्र प्रेशर हॉर्नचा सर्रास वापर होत आहे. त्याही पेक्षा भयंकर म्हणजे दुचाकी वाहनाच्या सायलेन्ससरमध्ये बदल करून भयंकर आवाज करून, ध्वनी प्रदूषण करून वाहन चालविण्याची जणू काही फॅशनच सुरू झालेली आहे. असे वाहन चालक आपणास रस्त्यावर केव्हाही, कुठेही, कोणत्याही वेळी बघायला मिळतात. अशा वाहन चालकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच सर्वत्र ट्रिपल सीट वाहन चालविण्याचे प्रकारही शहरात सुरू आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलांचा सुध्दा सहभाग आहे.शासकीय रूग्णालयाजवळ गतिरोधक नसल्यामुळे रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे. वाहनचालक बेधुंदपणे वाहन चालवित असल्यामुळे या ठिकणी केव्हाही अपघात घडू शकतो. या ठिकाणी मोठे गतिरोधक आवश्यक आहे. तसेच लक्ष्मीनारायण मंदिर परिसर, लोकमान्य शाळा या ठिकाणी सुध्दा मोठ्या गतिरोधकाची आवश्यकता आहे. येथेही कधीही अपघात घडून जिवहानी घडण्याची शक्यता आहे.काही दिवसांपूर्वी संपूर्ण चंद्रपूर शहरातील गतिरोधक काढून टाकण्यात आले. याबद्दल काही नगरसेवकांना विचारणा केली असता, न्यायालयाचे आदेश आहे म्हणून गतिरोधक काढले असे नगरसेवकांनी सांगितले. न्यायालयाचा आदेश फक्त ओबडधोबड गतिरोधकांसाठी आहे. नियमाप्रमाणे गतिरोधक उभारण्यास न्यायालयाची मनाई नाही. रामाळा तलाव मार्गावर अपघात घडल्यानंतर गतिरोधक उभारण्यात आले. त्यामुळे तेथे थोडी परिस्थिती सुधारली आहे. मात्र अपघात घडल्यावरच प्रशासन जागे होते, असे नागरिकांना वाटू लागले आहे. चंद्रपूर शहरात तुकूम-ताडोबा मार्गावर गतिरोधक उभारले आहेत. काही दिवसांपूर्वी या गतिरोधकांचीही उंची कमी करण्यात आली. असेच गतिरोधक शहरात उभारण्याची आणि वाहनांचा वेग कमी करण्याची अत्यंत गरज आहे. वाहतूक शाखेजवळ झेब्रा क्रॉसिंग आहे. यावरून लोकांना पायी जाण्यासाठी जागाच राहत नाही. येथे चारचाकी, तीनचाकी व दुचाकी वाहने उभी असतात. ५० हजारांपासून ते ५० लाखापर्यंत किंमतीच्या गाड्या वापरणाऱ्या लोकांना हे मात्र कळत नाही, त्यांना जर नेहमीच चालान करत राहीले तर ते सरळ होतील. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास वाहन चालकांविरूध्द कारवाई केली नाही तर वाहतूक नियम मोडण्याची सवय लोकांना लागते. त्यामुळे हेल्मेट सक्ती पुर्वी शहराची वाहतूक व्यवस्था सुधारणे आणि वाहन चालकांना कायद्याचा, नियमांचा धाक निर्माण करणे आवश्यक आहे. याकरिता पोलिसांनी वाहन चालकांवर प्रत्येक वेळेस नजर ठेवून कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणेसाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन१५ ते २० वर्षापुर्वी बस स्थानक, न्यायालयाजवळच्या रेल्वे ओव्हरब्रिजवर अपघात झाल्यामुळे तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी, पुलावरून ओव्हरटेक करण्यास मनाई केली होती. ओव्हरटेक केल्यास चालान केल्या जात होते. परंतु, नंतर बदलून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आज या पुलावर केव्हाही ओव्हरटेक केली जात असल्याने अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलावर ओव्हरटेक करणाऱ्यांत वाहनांना प्रशेर हॉर्न लावलेले, वाहनांच्या सायलेंन्सरमध्ये बदल करून ध्वनी प्रदूषन करणारे अधिक असतात. या ठिकाणी पुर्वी वाहतूक पोलीस उपस्थित राहात होते. ओव्हरटेक करणाºयांना चालान केले जात होते. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात होती. आता मात्र या ठिकाणी वाहतूक विभागाने अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, असे गंजवार्ड येथील प्रकाश पचारे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदानात म्हटले आहे.नागरिकांच्या अशा आहेत सूचना व मागण्यासंपूर्ण शहरात ओव्हरटेक करण्यास बंद घालण्यात यावी. तसेच शहराच्या बाहेर म्हणजे, मूलरोडवर एमईएल फॅक्टरीच्या पुढे, नागपूररोड वर वडगाव चौकीचे पुढे, बल्लारपूर रोडवर बाबुपेठ परिसर आणि रेल्वे ओव्हरब्रिजच्या पुढे, तुकूम-ताडोबा रोडवर मनपा हद्दीनंतर हेल्मेट सक्ती करावी, मनपा क्षेत्रात हेल्मेट सक्ती करून नये. हेल्मेट वापरणे हे ऐच्छिक असावे.वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर आणि ओव्हरटेक करणाºयावर, प्रेशर हॉर्न वाजविणाऱ्यावर सक्त कारवाई केली जावी.सायलेंन्सरमध्ये बदल करून ध्वनी प्रदूषण करून वेगाने वाहन चालवणाऱ्या, रस्त्यावर दहशत पसरविणाऱ्यांवर सक्तीची कठोर कारवाई करावी.शहरातील सर्व लहान रस्त्यांवर वाहनांची तपासणी करावी.वाहतूक विभागाच्या चारचाकी वाहनाने दिवसभर शहरात गस्त घालून बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई करत वाहतूक नियंत्रित करावी.गंजवार्ड, भाजी बाजार परिसरात सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत जड वाहतूक बंद करावी.झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभे करणाºयांना चालान करावे.