शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
3
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
4
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
5
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
6
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
8
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
9
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
10
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
11
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
12
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
13
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
14
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
15
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
16
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
17
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
18
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
19
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
20
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार

शहरी व ग्रामीण योजनांची अंमलबजावणी करा

By admin | Updated: May 10, 2017 00:47 IST

केंद्र व राज्य पुरस्कृत शहरी व ग्रामीण विकास योजनांची जिल्ह्यात तत्परतेने अंमलबजावणी करण्यासह ....

हंसराज अहीर : दिशा बैठकीत आढावालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र व राज्य पुरस्कृत शहरी व ग्रामीण विकास योजनांची जिल्ह्यात तत्परतेने अंमलबजावणी करण्यासह या योजनांच्या चालू आर्थिक वर्षातील उद्दिष्ट पूर्तीसाठी संबंधित विभागाच्या प्रमुखांनी योजनांचे योग्य नियोजन करावे. विकास योजनांची निश्चित कालावधीत अंमलबजावणी करावी, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. या योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांना मिळेल, याची दखल घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या साफल्य बचत भवनात जिल्हा विकास समन्वय सनियंत्रण समितीच्या २०१७-१८ या आर्थिक वर्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर होते. त्यावेळी त्यांनी विविध योजनांचा आढावा घेतला.या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, समितीचे सदस्य खुशाल बोंडे, तुळशीराम श्रीरामे, होमदेव मेश्राम, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, सदस्य सचिव जितेंद्र पापडकर, मनपा आयुक्त संजय काकडे, जिल्हा परिषद सभापती, पंचायत समिती सभापती, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अशोक शिरसे, कार्यन्वयीन यंत्रणाचे जिल्हास्तरीय अधिकारी आदी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य पुरस्कृत शहरी, ग्रामीण योजनांचा आढावा गृहराज्यमंत्र्यांसमोर सादर केला.त्यांनी योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी व त्रुटी उपस्थित लोकप्रतिनिधींना निदर्शनास आणून दिल्या. यावेळी ना. अहीर यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेची माहिती जाणून घेतली. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अनेक त्रुट्या असल्याचे सांगण्यात आले. या सभेत पं.स. सभापतींनी हा मुद्दा प्रकर्षाने उपस्थित केला होता.जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या योजनेअंतर्गत कामे करणाऱ्या मजुरांच्या वेतनाची तक्रारी मांडण्यात आली. त्याची दखल घेऊन ना. अहीर यांनी मजुरांच्या खात्यावर तत्काळ मजुरी जमा करण्याचा आदेश दिला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकूल बांधकामाचा निधी उपलब्ध होत नसल्याने या घरकूल बांधकामाचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांना तातडीने उपलब्ध होईल अशी व्यवस्था संबंधीत कार्यान्वयन अधिकाऱ्यांनी करावी.कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ प्रशासन अधिकारी अरुणा गतफणे तर आभार प्रदर्शन प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी केले.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विशेष सभाकेंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कोरपना, जिवती व राजुरा तालुका क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येची गंभीर दखल घेतली आहे. ही समस्या यथाशीघ्र मार्गी लागेल, याची वरिष्ठांनी तातडीने दखल घेवून प्रभावी उपाययोजनाद्वारे हा प्रश्न सोडवावा, असे निर्देश दिले. २५ मे रोजी पाणीटंचाई संदर्भात विशेष सभा आयोजित करून या सभेत ही समस्या सोडविण्याकरिता अधिकाऱ्यांनी प्राधान्याने कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या आहेत.