शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका; चंद्रपूर केंद्राची वीज निर्मिती निम्म्यावर

By राजेश भोजेकर | Updated: January 4, 2023 14:39 IST

Mahavitaran Employee Strike : अनेक भागात वीज पुरवठ्यावर परिणाम

चंद्रपूर :चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राचे कर्मचारी, अभियंता, अधिकारी खासगीकरणाच्या विरोधात संपावर गेल्याने वीज निर्मिती प्रभावीत झाली असून 2920 मेगावॉट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या चंद्रपूर वीज केंद्राची वीज निर्मिती निम्म्यावर आली आहे.

चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रात 11 लाख 76 हजार टन एवढा भरमसाठ कोळशाचा साठा आहे. मात्र कर्मचारीच संपावर असल्याने याचा फटका वीज केंद्राला बसत आहे. मंगळवारी 210 मेगावॉटचा तिसरा व पाचशे मेगावॉटचा चौथा, पाचवा, सहावा, आठवा व नवव्या संचातून सुरळीत वीज निर्मिती सुरू होती. केवळ पाचशे मेगावॉटचा सातवा संच बंद होता. दरम्यान मंगळवारी संप कालावधीत 500 मेगावॉटचा चौथा व पाचवा संच बंद झाला. 

सध्या चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रात पाचशे मेगावॉटचे तीन संच बंद असल्याने यातून होणारी वीज निर्मिती ठप्प आहे. येथे सुरू असलेल्या संच क्रमांक तीन, सहा, आठ व नऊ या चार संचातून अनुक्रमे 108, 338, 406, 409 अशी एकूण केवळ 1271 मेगावॉट एवढीच वीज निर्मिती सुरू आहे.

Mahavitaran Strike | चंद्रपूर जिल्ह्यातील साडेआठ हजार वीज कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर

210 मेगावॅटचे तीन व चार व पाचशे मेगावॉटचे पाच, सहा, सात, आठ, नऊ असे एकूण सात संच असलेल्या चंद्रपूर वीज केंद्राची 2920 मेगावॉट वीज निर्मितीची क्षमता आहे. मात्र संप काळात येथील वीज निर्मिती निम्म्यावर आली आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात बत्ती गुल होण्याची आशंका निर्माण झाली आहे. असाच संप सुरू राहिलास राज्यात काही भागात काळोख पसरण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरणStrikeसंपEmployeeकर्मचारीchandrapur-acचंद्रपूर