शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात ८८४३ गणेशमूर्तींचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST

विसर्जनाच्या दिवशी चंद्रपूरकरांनी मोठया संख्येने बाहेर पडत लाडक्या बाप्पाला उत्साहाने निरोप दिला. याप्रसंगी गणेश विसर्जनाच्या मुख्य स्थळांकडे जाणारे रस्ते गदीर्ने फुलून गेले होते. अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

ठळक मुद्देसकाळीच रस्ते स्वच्छ : तलावाचीही तत्काळ स्वच्छता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या १० दिवसांपासून मोठ्या भक्ती भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला. विसर्जनाच्या दिवसापर्यंत एकूण ८८४३ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने शनिवारी सकाळ होण्यापूर्वीच शहरातील मुख्य रस्त्यांची सफाई केली. त्यानंतर दुपारच्या सुमारास रामाळा तलावातील मूर्तीचे लाकडे व इतर कचरा काढून तलाव स्वच्छ केला.विसर्जनाच्या दिवशी चंद्रपूरकरांनी मोठया संख्येने बाहेर पडत लाडक्या बाप्पाला उत्साहाने निरोप दिला. याप्रसंगी गणेश विसर्जनाच्या मुख्य स्थळांकडे जाणारे रस्ते गदीर्ने फुलून गेले होते. अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. महानगरपालिकेतर्फे जटपूरा गेटवरून बाप्पांवर पुष्पवृष्टी करून सर्व गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकींचे स्वागत करण्यात येत होते. शहरात ठिकठिकाणी लाडक्या गणरायाला थाटात ढोल- ताशांच्या मिरवणुकीत वाजत-गाजत ‘गणपती बाप्पा, मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात मोठ्या भक्तीभावाने निरोप देण्यात आला.विसर्जनादरम्यान विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी रेन वॉटर हार्वेस्टींग, पर्यावरण रक्षण, वृक्ष लागवड, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध, प्रदूषण नियंत्रण याबाबत आकर्षक देखाव्याद्वारे जनजागृती केली. गणेश विसर्जन रात्री उशिरा २.३० वाजेपर्यंत सुरु असल्याने स्वच्छतेकरिता महानगरपालिका सफाई कर्मचारी सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत निरंतर कार्यरत होते.चंद्रपुरात २४ डीजेवर कारवाईगणेश विसर्जनादरम्यान ध्वनीप्रदूषण करणाऱ्या २४ डिजेवर चंद्रपूर रामनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री कारवाई केली. जिल्ह्यात पोलीस विभागाने कर्णकर्कश आवाजाने डीजे वाजविण्यावर बंदी घातली आहे. तरीही अनेक गणेश मंडळांनी गुरुवारी डिजेच्या मोठया आवाजात वाजतगाजत मिरवणूक काढली. मात्र चंद्रपूर पोलिसांनी ध्वनीप्रदूषण करणाºया डिजेविरुध्द विशेष मोहीम राबवत ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० नुसार २४ वाहनावर कारवाई केली. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हाके यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन