लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार जनघातकी धोरण राबवित आहे. पेट्रोल, डिझेल व वीज बिलात वाढ करून जनतेला महागाईच्या खाईत लोटत आहे. शेतकºयांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी तातडीने दसºयापर्यंत करून भारनियमनातून मुक्ती देण्याच्या मागणीसाठी शिवसेनाच्या वतीने बुधवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. येथील तहसीलदार विकास अहीर यांना शिवसेनाचे जिल्हा प्रमुख दिलीप कपूर व उपजिल्हा प्रमुख तथा नगरसेवक विनोद उके, सिक्की यादव यांच्या नेतृत्वात निवेदन सादर केले.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात शिवसेनाने विविध मागण्यासाठी मोर्चा काढून घरचा अहेर दिला. केंद्र व राज्याच्या सत्तेत शिवसेनेची भागीदारी आहे. मात्र पेट्रोल, डिझेल व घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर व वीज बिलात मोठी वाढ करून महागाई वाढविली आहे. परिणामी सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. जीवनाश्यक वस्तूच्या भावात दरदिवशी वाढ होत आहे. बेरोजगारीने तरुणात असंतोष निर्माण झाला आहे. शेतकºयांना कर्जमाफी जाहीर करूनही अंमलबजावणी होत नाही. अशातच ऐन शेतीच्या हंगामात शेतकºयांना भारनियमनाच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप शिवसेनाचे उपजिल्हा प्रमुख विनोद उर्फ सिक्की यादव यांनी केला.येत्या दसºयापर्यंत शेतकºयांना कर्जमाफीचे अनुदान देण्यात यावे. अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करणार, असा इशारा यावेळी देण्यात आला. येथील तहसीलदार विकास अहीर यांना निवेदन देणाºया शिष्टमंडळात दिलीप कपूर, नगरसेवक सिक्की यादव, नगरसेवक रंजिता बीरे, माजी नगरसेवक प्रभाकर मुरकुटे, जीवन बुटले, सागर माझरकर, प्रदीप गेडाम, बाबा शाहू, ज्योती गहलोत, प्रगती झुल्लारे, प्रणय काकडे, प्रकाश पाठक, रामू मेदरकर, संदीप बोरकर यांच्यासह शिवसेनाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कर्जमाफीची तातडीने अंमलबजावणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 23:54 IST
राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार जनघातकी धोरण राबवित आहे. पेट्रोल, डिझेल व वीज बिलात वाढ करून जनतेला महागाईच्या खाईत लोटत आहे.
कर्जमाफीची तातडीने अंमलबजावणी करावी
ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन