शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
2
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
3
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
4
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
5
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
6
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
7
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
9
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
10
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
11
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
12
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
13
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
14
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
15
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
16
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
17
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
18
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
19
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!

आयएमए देणार आठवड्यातून एक दिवस मोफत रुग्णसेवा; नवनिर्वाचित अध्यक्ष घाटे यांचा संकल्प : हजारो रुग्णांना होणार लाभ

By साईनाथ कुचनकार | Published: April 23, 2024 3:01 PM

Chandrapur : आठवड्यातून एक दिवस मोफत रुग्णसेवा देण्याचा आयएमएने केला संकल्प; रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजकारण करण्याचे आवाहन

चंद्रपूर : ग्रामीण भागातील रुग्णांना आठवड्यातून एक दिवस मोफत रुग्णसेवा देण्याचा आयएमएने संकल्प केला आहे. यासंदर्भात नवनियुक्त अध्यक्ष डाॅ. संजय घाटे यांनी यांसदर्भात घोषणा केली आहे. या संकल्पामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.आयएमए चंद्रपूरच्या नवीन कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ रविवार दि. २१ एप्रिल रोजी चंद्रपूर येथील आयएमए सभागृहात पार पडला. याप्रसंगी डाॅ. घाटे यांनी याबाबत उपस्थितांना माहिती दिली.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्पेशलिस्ट डॉक्टरांची अत्यंत गरज आहे. त्यामुळे लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ व किडनी सर्जन म्हणून आठवड्यातून एक दिवस जिल्हा शल्य चिकित्सकांच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयात आपल्या सेवा मोफत तेथे जाऊन देऊन असा संकल्पही त्यांनी केला.आयएमएच्या समारंभाकरिता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रंसगी आयएमएचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ. विंकी रुगवानी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या हस्ते डॉ. संजय घाटे व त्यांच्या कार्यकारिणीने पदभार घेतला.

प्रसंगी बोलताना आयएमएचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी डॉक्टरांच्या समाजाबद्दल तसेच समाजाच्या सुद्धा डॉक्टरांबद्दलच्या कर्तव्यांची जाणीव करून दिली. डॉ. रुघवाणी यांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या रुग्ण व डॉक्टर यांच्यामधील समन्वयतेच्या बद्दलची व कौन्सिलच्या कार्याची माहिती दिली.

याप्रसंगी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार सुभाष धोटे यांनी डॉ. संजय घाटे यांनी ग्रामीण रुग्णांसाठी घेतलेल्या संकल्पाची प्रशंसा केली. जास्तीत जास्त डॉक्टरांनी अशा प्रकारे रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजकारण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला आयएमएचे सर्व डॉक्टर्स, शहरारातील नागरिकांची उपस्थिती होती.

अशी आहे कार्यकारिणीअध्यक्ष डाॅ. संजय घाटे, सचिव डॉ. प्रवीण पंत, कोषाध्यक्ष डॉ. अप्रतिम दीक्षित, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद पोटदुखे, डॉ. अमित देवईकर, डॉ. नगिना नायड, डॉ. किरण जानवे, सहसचिव डॉ. वंदना रेगुंडवार, डॉ. वीरेंद्र कोल्हे, डॉ. सौरभ निलावार, डॉ. सुश्रुत भुक्ते, डॉ. रोहन कोटकर, महिला डॉक्टर विंगच्या चेअर पर्सन म्हणून डॉ. अपर्णा देवईकर, कोचेअर पर्सन डॉ. पूनम नगराळे, सचिव डॉ. समृद्धी आईचवार, पुढील वर्षीचे अध्यक्ष म्हणून डॉ. रितेश दीक्षित यांनी पदभार स्वीकारला.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारMedicalवैद्यकीयHealthआरोग्य