शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात घुसखोरी केल्यास कायदेशीर कार्यवाही होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 19:51 IST

चंद्रपूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून वा राज्यातून छुप्या मार्गाने घुसखोरी करणाऱ्यांना आता कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागणार आहे, असे आदेशच जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी शुक्रवारी निर्गमित केले आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत’च्या वृत्ताची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून वा राज्यातून छुप्या मार्गाने घुसखोरी करणाऱ्यांना आता कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागणार आहे. असे आदेशच जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी शुक्रवारी निर्गमित केले आहे. यामुळे आता बाह्य घुसखोरीला आळा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.‘बाह्य घुसखोरांमुळे चंद्रपूर जिल्ह्याला धोका’ अशा शिर्षकाखाली शुक्रवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताला जिल्हा प्रशासनाने अतिशय गांभिर्याने घेतले आहे. इतकेच नव्हे तर याबाबत आदेशच काढले आहे. परराज्यात छुप्या मार्गाने चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाल्यास संबंधित व्यक्तीने याबाबतची सूचना जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणेस देण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित व्यक्तीची आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये कार्यवाही करण्यात येणार आहे.जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. परिणामी चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. अशातच लॉकडाऊनमुळे मुंबई, पुण्यासह बाहेर जिल्ह्यात व बाहेर राज्यात अडकलेली मंडळी पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करीत आहेत. यामुळे आरोग्य विभागापुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे, ही बाब ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.या सोबतच क्वारंटाईन व्यक्तींनाही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. या व्यक्तीने इतर व्यक्तीशी संपर्क टाळावा. दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असेही आदेशात म्हटले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस