शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

भिसी वनक्षेत्रातून सागाची अवैध तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 06:00 IST

चिमूर तालुक्यात मोठया प्रमाणात जंगल क्षेत्र आहे. या जंगलात सागवान झाडांचे प्रमाण जास्त आहे. बांधकाम व गृह उपयोगी वस्तुकरिता सागाचे लाकूड वापरल्या जात असल्याने या लाकडांची मागणी खूप आहे. त्यामुळे वनविभागाच्या राखीव क्षेत्रातून सागवान झाडांची कत्तल करून रात्री त्याची वाहतूक करण्यात येते.

ठळक मुद्देवनविकास महामंडळाची कारवाई : सहा लाखांच्या मुद्देमालासह आठ जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यातील राखीव वनक्षेत्रातून मोठया प्रमाणात होणाऱ्या साग झाडांच्या तस्करीवर आळा घालण्याकरिता वनविकास महामंडळाने विशेष पथकाच्या रात्रीच्या गस्त वाढविलेल्या आहेत. रात्रपाळी गस्तीवर पथक असताना सोमवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान भिसी ते जांभूळविहिरा रोडवर अवैधरित्या साग झाडांची तोड करून त्याची वाहतूक ट्रॅक्टरने करीत असल्याचे आढळले. ट्रक्टर भरून सागाची तस्करी करणारे ट्रक्टर व सहा लाखाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आठ आरोपीना अटक करण्यात आली.चिमूर तालुक्यात मोठया प्रमाणात जंगल क्षेत्र आहे. या जंगलात सागवान झाडांचे प्रमाण जास्त आहे. बांधकाम व गृह उपयोगी वस्तुकरिता सागाचे लाकूड वापरल्या जात असल्याने या लाकडांची मागणी खूप आहे. त्यामुळे वनविभागाच्या राखीव क्षेत्रातून सागवान झाडांची कत्तल करून रात्री त्याची वाहतूक करण्यात येते. यावर अंकुश ठेवण्याकरिता वनविकास विभागाचे विशेष पथक तयार करून त्यांच्या रात्रीच्या गस्ती वाढविल्या आहेत.या पथकाद्वारे भिसी - जांभुळविहीरा रोडवर गस्त सुरू असताना रात्री १० वाजताच्या सुमारास संशयास्पद ट्रॅक्टरची (क्रमांक एमएच ३४ एल ७३३८) तपासणी केली असता अवैध सागाची वाहतूक करीत असल्याचे आढळले.ट्रॅक्टरमध्ये सागाचे ४२ नग (१.६२६ घमी), ज्याची बाजार किंमत जवळपास एक लाख आणि ट्रॅक्टर किंमत पाच लाख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपी दिनेश वासुदेव दिघोरे रा. भिसी व त्याचे इतर सात सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. सदर प्रकरणात आरोपीवर भारतीय वन अधिनियम १९२७ कलम ५२ (१) (१अ) ४१ (१)(२)(ड)(इ) तसेच महाराष्ट्र झाड तोडणे अधिनियम १९६४ कलम ५(२) प्रमाणे वन गुन्हाची नोंद करण्यात आली. आरोपी व ट्रॅक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कार्यवाही विशेष पथकाचे प्रमुख वन परिमंडळ अधिकारी रमेश बलैया, क्षेत्र सहायक आशिष बायस्कर, वनरक्षक आर.पी. आगोसे, चव्हाण, घुठे यांनी पार पाडली. वनाधिकाऱ्यांनी अटक केलेल्या आरोपींना चिमूर न्यायालयात हजर केले.पुढील तपास पश्चिम चांदा वनप्रकल्प विभागाचे विभागीय वनाधिकारी विवेक मोरे, सहायक व्यवस्थापक सुनील आत्राम तसेच वनपरिक्षेत्राधिकारी ऋतुराज बारटक्क्के यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी तपास करत आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभाग