ट्रॅक्टर चालकाचे नाव तेजस विठोबा बोरकर (रा. पिपर्डा) असून, हा ट्रॅक्टर योगेश बोरकर (रा. पिपर्डा) यांच्या मालकीचा आहे. मागील काही दिवसांपासून रेती तस्करांनी धुमाकूळ घातला असून, रात्री -बेरात्री भरधाव वेगाने जंगल मार्गाने पिपर्डा घाटातील, तसेच सरांडी घाटातील रेती ट्रॅक्टरने नेत असल्याने वन्यप्रांण्याच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. नवरगाव वनविभागाचे कर्मचारी रात्री गस्तीवर असताना रत्नापूर बिटातील कक्ष ११९१ संरक्षित वनातून रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना रेतीसह नंबरप्लेट नसलेला महिंद्रा विवो कंपनीचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. यात ट्रॅक्टरसह आठ लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण कुमार गौड यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक सुनील बुल्ले, वनरक्षक जे. एस. वैद्य, आर. यु. शेख, नीतेश शहारे, राजश्री नागोसे, दिवाकर गुरुनुले यांनी केली.
नवरगाव येथे अवैध रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:24 IST