शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिंपरीच्या कंत्राटदारांकडून रेतीचे अवैध ‘डम्पिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:19 IST

तालुका सीमेवर बारमाही वाहणाऱ्या तीन मोठ्या नद्या असून महसूल विभागामार्फत दरवर्षी या रेती घाटाचा लिलाव केला जाते. येथील रेती उच्च दर्जाची असल्याने बाहेरील मोठ्या कंपन्यांना रेती पुरवठ्यासाठी रेतीघाट लिलाव दरम्यान तगडी बोली लावून घाट कंत्राट मिळविण्याची स्पर्धा कंत्राटदारात होते. मात्र पावसाळा पूर्व अधिकची रेती उपसा करून रेतीघाट मालक रेतीचे अवैध ‘डम्पिंग’ करीत आहेत. या रेतीची गरजवंताना बेभाव विक्री केली जात असताना महसूल विभाग मात्र दुर्लक्ष करीत आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागाचे दुर्लक्ष : गरजूंना रेतीची बेभाव विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : तालुका सीमेवर बारमाही वाहणाऱ्या तीन मोठ्या नद्या असून महसूल विभागामार्फत दरवर्षी या रेती घाटाचा लिलाव केला जाते. येथील रेती उच्च दर्जाची असल्याने बाहेरील मोठ्या कंपन्यांना रेती पुरवठ्यासाठी रेतीघाट लिलाव दरम्यान तगडी बोली लावून घाट कंत्राट मिळविण्याची स्पर्धा कंत्राटदारात होते. मात्र पावसाळा पूर्व अधिकची रेती उपसा करून रेतीघाट मालक रेतीचे अवैध ‘डम्पिंग’ करीत आहेत. या रेतीची गरजवंताना बेभाव विक्री केली जात असताना महसूल विभाग मात्र दुर्लक्ष करीत आहे.तालुका सीमेवर वैनगंगा, अंधारी व वर्धा या बारमाही नद्या वाहतात. तसेच लिखितवाडा, धाबा, हिवरा या नाल्यातही प्रचंड प्रमाणात रेती असते. दरवर्षी तालुक्यातून येनबोथला, लिखीतवाडा, फुरडी हेटी, वढोली (बामणी), धाबा, चेकसोमनपल्ली, तारडा, तारसा, हिवरा आदी रेतीघाटांचा केला जाते. येथील रेती उच्च प्रतिची असल्याने शेजारील तेलंगाणा राज्यासह स्थानिक जिल्ह्यातील कंपन्यांना तसेच मोठ्या व किरकोळ बांधकामाकरिता रेतीची प्रचंड मागणी असते. यामुळे रेतीघाट कंत्राटदार स्पर्धा करीत आहेत.महसूल विभागाचे अधिकारी वर्ग व घाटमालकांचे साटेलोटे असल्याने अतिरिक्त व सूर्यास्तानंतरही वाहतूक होते. जेसीबी, पोकलॅन्ड मशिनद्वारे उत्खनन व सीमांकन क्षेत्राच्या बाहेर उत्खनन होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने पावसाळा सुरू होताच येथील तस्करांनी शेकडो ब्रास रेती डंम्प करून गरजवंतांना ३ हजार ५०० ते ४ हजारात विक्री करीत आहेत. याकडे मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असून तस्करांचे चांगलेच फावत आहे.तालुक्यातील रेती घाट कंत्राटदांरापैकी केवळ एकाच कंत्राटदाराला साठवणुकीची परवानगी देण्यात आली आहे. इतरत्र जर कुणी वाळूची साठवणूक केली असेल तर ती अवैध आहे. त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल.- सोनाली मेटकरतहसीलदार, गोंडपिपरी.