शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

चिमूर बसस्थानकापुढेच अवैध प्रवासी वाहतूक

By admin | Updated: February 22, 2015 01:00 IST

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य घेऊन सेवेत रूजू झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे चिमूर येथे आगार आहे. परंतु या आगारासमोरच अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

चिमूर : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य घेऊन सेवेत रूजू झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे चिमूर येथे आगार आहे. परंतु या आगारासमोरच अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आमिष दाखवित प्रवाशांना आकर्षित केले जाते. यामुळे महामंडळाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे.वरोरा-चिमूर-काम्पा हा राज्य महामार्ग आहे. या राज्यमार्गावरच चिमूर आगार आहे. चिमूर हे तालुक्याचे स्थान आहे. त्यामुळे रोज हजारो प्रवाशी ये-जा करतात. प्रवाशाची रेलचेल बघता अवैध प्रवासी वाहतूक फोफावली आहे. परंतु हे अवैध प्रवासी वाहतूक करणारे चिमूर आगाराच्या मुख्य दरवाजाावरच आपली वाहने उभे करून प्रवाशांची ने-आण करतात. आजघडीला चिमूर येथे दहा खाजगी ट्रॅव्हल्स, शंभराहून अधिक ट्रॅक्स-कमांडर, ५० आॅटो धावत आहे. या सर्व वाहन चालक मुख्य दरवाजावर येऊन प्रवाशांना आवाज देत असतात. यासोबतच प्रवाशांना बोलविण्यासाठी वाहनाचे कर्कश हार्न वाजवित असतात.या मुख्य मार्गावरच तहसील कार्यालय आहे. या तहसील कार्यालयाच्या गेटजवळच अवैध प्रवाशी वाहने उभे राहतात. वाहनाच्या आवाजाने व कर्णकर्कश हार्नने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तहसिल कार्यालयाचा परिसर हा शांतता झोन म्हणून ओळखला जातो. परंतु या नियमाचे सऱ्हास उल्लंघन होत आहे.चिमूर शहरातील मुख्य राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे राज्य महामार्गावरुन एकेरी वाहतूक सुरू आहे. अवैध प्रवासी वाहन येथेच उभे राहतात तर काही अवैध प्रवासी वाहन येथूनच वळण घेतात. त्यामुळे इतर वाहनाला व पदचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. बसस्थानकाच्या मुख्य दरवाजापासून २०० मीटर अंतराच्या आत आपली वाहने उभे करू शकत नाही. परंतु या नियमांचे उल्लंघन वारंवार होत असताना दिसून येत आहे.याबाबत आगार व्यवस्थापक ए.एम. मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महामंडळाच्या बसच्या २९६ फेऱ्यांची व्यवस्था केली आहे. त्यात ४३ फेऱ्या या तोट्यात आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा फटका आगाराला बसत आहे. अवैध प्रवाशी वाहनावर कारवाई करण्याचे अधिकार महामंडळाला नाही. त्यामुळे या संदर्भात पोलिसांकडे वारंवार तक्रार केल्या जाते. परंतु या तक्रारीची दखल घेतली जात नाही.तहसील कार्यालयाच्या गेटवरच अवैध प्रवासी वाहन उभे राहत असल्याने येथील तहसीलदार तळपाडे यांनी याबाबत चिमूर पोलीस स्टेशनला लेखी माहिती देऊन तेथील वाहने हटविण्याचे आदेश दिल. परंतू या आदेशाचेही अजूनपर्यंत पालन झाल्याचे दिसून येत नाही. (शहर प्रतिनिधी)