शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
8
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
9
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
10
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
11
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
12
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
13
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
14
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
15
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
16
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
17
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
18
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
19
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
20
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

तंटामुक्त समित्यांपुढे अवैध धंद्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST

या मोहिमेत गावांना विविध उपक्रम राबवून गाव तंटामुक्त करणे आणि पर्यायाने गावाचा विकास साधावयाचा असतो. अवैध धंदे तसेच धार्मिक कलह असेल तर गावाचा विकास कदापिही साध्य होणार नाही. दारू, सट्टा, जुगार हे अवैध धंदेच शांतता धोक्यात येण्याचे मुळ कारण आहे. त्यामुळे अशा अवैध धंद्यालाच मुठमाती दिली तर गावाची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल करण्यास वेळ लागणार नाही.

ठळक मुद्देराजकारणाने उद्दिष्टाला फाटा : मानपानात अडकल्या समित्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गावपातळीवर तंटे निर्माण होऊ नये, दाखल असलेल्या व नव्याने निर्माण होणाऱ्या तंट्याचे निराकरण करून ते कमी करणे, नागरिकांच्या सहकार्याने अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे व त्याचे निर्मूलन करणे, अनिष्ठ प्रथा व चालीरिती नष्ट करण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आदी उद्दीष्टे समोर ठेवून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली आहे. मात्र या मागील काही वर्षांमध्ये या समित्या थंडावल्या असून गावातील अवैध धंद्यांचे आव्हान या समित्यांना आजही कायम आहे. त्यामुळे या समित्यांनी केवळ नावापूरते न रहाता गावविकासासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.या मोहिमेत गावांना विविध उपक्रम राबवून गाव तंटामुक्त करणे आणि पर्यायाने गावाचा विकास साधावयाचा असतो. अवैध धंदे तसेच धार्मिक कलह असेल तर गावाचा विकास कदापिही साध्य होणार नाही. दारू, सट्टा, जुगार हे अवैध धंदेच शांतता धोक्यात येण्याचे मुळ कारण आहे. त्यामुळे अशा अवैध धंद्यालाच मुठमाती दिली तर गावाची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल करण्यास वेळ लागणार नाही. यावर शिक्कामोर्तब झाले तर गावकऱ्यांच्या सहकार्याने तंटामुक्त गाव समितीने अवैध धंदे रोखण्यासाठी प्रयत्न करावे. असे शासनाने सूचविले आहे. त्या दृष्टीने प्रत्येक गावातील तंटामुक्त समितीने दारूबंदीसाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. अवैध धंदे करणाऱ्या लोकांना पर्यायी रोजगाराकडे वळविण्याचा प्रयत्न या मोहिमेच्या माध्यमातून करणे, व्यसनमुक्तीसाठी कार्यक्रम राबविणे, व्यसनी लोकांचे समुपदेशन करणे, आवश्यकतेनुसार पोलिसांची मदत घेणे वा इतर कामी पोलिसांना सहकार्य करणे ही कामे समिती पदाधिकाºयांना करावी लागतात. भांडण तंटे व कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्यास कारणीभूत ठरणाºया दारूला गावातून हद्दपार करण्याचे कर्तव्य तंटामुक्त गाव समित्यांनी पोलिसांच्या सहकार्याने पार पाडणे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेत अपेक्षित आहे. मात्र याचा विसर बहुतांश समितीच्या पदाधिकाऱ्याना पडल्याचे चित्र जिल्ह्यात सध्या दिसत आहे. ग्रामपंचायत, समित्या, बचत गटातील महिला व राजकीय नेत्यांनी कर्तव्याची जाणीव ठेवून गावात शांतता राहावी, गावाचा सर्वांगिण विकास साधला जावा, यासाठी गावाचा स्२ार्वांनी एकोपा निर्माण करून एकमेकाप्रती निर्माण झालेली कलुषीत भावना दूर सारून सरपंच, पोलीस पाटील, संबंधित पदाधिकाऱ्यानी अवैध धंदे हद्दपार करण्याचे ठरविले तर ते सहज शक्य आहे. मात्र राजकारण आडवे येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Socialसामाजिक