शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

अवैध दारु विक्री व अनिर्बंध वाहतुकीने नागरिक त्रस्त

By admin | Updated: September 15, 2014 00:02 IST

कोरपना शहरासह परिसरात चालणाऱ्या अवैध धंद्यांना आळा घालण्याचा पुरेसा प्रयत्न पोलीस व संबंधित विभाग करीत नसल्याचे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठाणेदाराची बदली

कोरपना : कोरपना शहरासह परिसरात चालणाऱ्या अवैध धंद्यांना आळा घालण्याचा पुरेसा प्रयत्न पोलीस व संबंधित विभाग करीत नसल्याचे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठाणेदाराची बदली झाल्यानंतर येणारे नवे ठाणेदार अनिर्बंध वाहतूक, अवैध दारू विक्री आणि गुन्हेगारीवर प्रभावीपणे अंकुश लावतील, अशी अपेक्षा केली जाते. परंतु पदरी नेहमीच निराशा येते, असा येथील जनतेचा अनुभव आहे. अतिसंवेदनशील आंध्रा सीमेलगत असलेला कोरपना तालुक्यात सर्वत्र अवैध धंद्याना उत आला आहे. यावर आळा बसावा, अशी परिसरातील जनतेची मागणी आहे. पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून अनेक अवैध व्यवसायिक बेधडकपणे अवैध व्यवसाय करीत आहेत. तालुक्यात वनसडी गावालगतच्या देशी दारुच्या दुकानातून दररोज भरदिवसा दुचाकी वाहनाने परसोडा फाटा, मांडवा, कोरपना, तांबाडी फाटा अशा अनेक गावांमध्ये दारु पोहचविली जात आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील मुकूटबन येथील नदी पात्रातून वणी तालुक्यातील दारू कोरपना तालुक्यात पोहचविली जात आहे. या तालुक्यात सावकारी, जुगार, केरोसीनचा काळा बाजार गॅस सिलेंंडरचा अवैध वापर, खताची तस्करी, सुगंधीत तंबाखुची तस्करी असे एक ना अनेक अवैध धंदे बोकाळले आहेत. मात्र प्रशासनाला याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसते. कोरपना परिसरात सणाच्या व बंदच्या दिवशी सर्रासपणे देशी व विदेशी दारु विकली जाते. या अवैध दारु विक्री मुले शेकडो कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र पोलिसांचा आशिर्वाद असल्याने मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारु विक्री होत आहे. कोरपना, वणी, गडचांदूर येथून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये सर्रास केरोसीनचा वापर केल्या जात आहे. मात्र गरजू नागरिकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवून जास्त भावाने वाहतूक करणाऱ्या वाहनांना केरोसीन विकले जात आहे. असे चित्र कोरपना तालुक्यात असतानासुद्धा पोलीस विभाग सुस्त आहे. तीनचाकी वाहनामध्ये १५ ते २० प्रवासी बसविले जातात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याची जाणिव असुनही पोलीस यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पररसोडा माईन्सची अनेक वाहने तसेच गिट्टी व रेतीची वाहतूक करणारी वाहने ओव्हरलोड असतात. ुपरिणामी मुख्य मार्गाची दैनावस्था झाली आहे. अपघातही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या अपघातात अनेक दुचाकी वाहनस्वारांना जीव गमवावा लागला. या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी कोणतीही उपाययोजन केली जात नाही. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये कोरपना, गडचांदूर महामार्गावर अनेक अपघात झालेत. जड वाहतुकीमुळे अनेकांचे बळी गेले. मात्र जडवाहनांच्या अनिर्र्बंध वाहतुकीला पायबंंध बसला नाही. गडचांदूर ते कोरपना मार्गावर चालणाऱ्या अवैध प्रवासी वाहनांवर अल्पवयीन मुले चालक म्हणून काम करीत आहेत. काही जणांकडे तर चक्क वाहन चालविण्याचा परवानासुद्धा नाही. अनेक वाहनांना ब्रेक लाईट नाही. काही वाहने भंगार अवस्थेत असल्याने अपघात घडून त्यात निरपराधांचा बळी जाण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)