शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
2
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
3
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
4
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
5
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
8
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
9
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
10
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
11
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
12
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
13
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
14
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
15
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
16
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
17
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
18
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
19
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!

फायर आॅडिटकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 23:58 IST

शहरातील ९० टक्के शाळा, महाविद्यालये व रुग्णालयांनी फायर आॅडिट केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एखादे वेळी अनुचित प्रकार घडून आग लागल्यास मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा सर्वाधिक धोका विद्यार्थी व रुग्णांना आहे.

ठळक मुद्देमनपाने कारवाई करावी : विद्यार्थी, रूग्णांना उद्भवू शकतो धोका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील ९० टक्के शाळा, महाविद्यालये व रुग्णालयांनी फायर आॅडिट केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एखादे वेळी अनुचित प्रकार घडून आग लागल्यास मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा सर्वाधिक धोका विद्यार्थी व रुग्णांना आहे.शाळा, महाविद्यालय, रुग्णालयात आगीच्या अनेक घटना घडतात. अनेकांना या आगीत जीव गमवावा लागला आहे. याची दखल घेत शासनाने जीव सुरक्षा व अग्नीसुरक्षा कलम २००६ व २००९ अधिनियमांर्तगत फायर अ‍ॅडिट करण्याचा कायदा लागू केला. या नियमाअंतर्गत सर्व शाळा, महाविद्यालयांना फायर अ‍ॅडिट करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी शासनाने १८२ एजन्सी नेमून या एजन्सीकडे आॅडिट करण्याचे काम सोपविले. एजन्सीने अ‍ॅडिट करून तसा अहवाल मनपा अग्निशमन दलाकडे सादर करायचा आहे. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी क्रॉसचेकींग करुन तसा अहवाल देणार आहेत. मात्र, याबाबत माहिती घेतली असता, अनेक शाळा व महाविद्यालयानी अ‍ॅडिटच केले नसल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाºयांना याबाबत विचारणा केली असता, काही शाळांचेच फायर अ‍ॅडिटसाठी अर्ज आल्याचे सांगितले. त्यामुळे शाळा, महाविद्यालय, रुग्णालयात आगीची घटना घडल्यास विद्यार्थी व रुग्णाच्या जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता आहे. शहरात जवळपास ४० मनपा शाळा, ६० रुग्णालये व ५० खाजगी शाळा तर ६० च्या जवळपास रुग्णालये आहेत. यापैकी अनेक शाळा व रुग्णालयाचे आॅडिट झालेले नाही. तसेच १५ मिटर उंच इमारतीना ड्रायडंट सिस्टीम बसविणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक उंच इमारतीना अशी सिस्टम बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी आगीची घटना घडल्यास मोठा घातपात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठांनी दखल घ्यावी तसेच विद्यार्थी, रुग्णांनीही खबरदारी बाळगण्याची आवश्यकता आहे.अनेक ठिकाणी घडल्या आगीच्या घटनाशाळा-महाविद्यालय किंवा रूग्णालयात आग लागल्याची घटना यापूर्वी अनेकदा राज्यात घडल्या आहेत. चंद्रपूर शहरात आजपर्यंत अशी घटना घडली नसली तरी उंच इमारतीमध्ये आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता फायर अ‍ॅडिट करून घेणे आवश्यक आहे.फॉयर आॅडिट करण्यासाठी मनपाकडून दरवर्षी जाहीर सूचना काढली जाते. मात्र अनेक शाळा-महाविद्यालये तसेच रूग्णालये फायर अ‍ॅडिट करण्याकडे दुर्लक्ष करतात. जवळपास १० टक्केच शाळा-महाविद्यालय, रूग्णांलयांचे फायर अ‍ॅडिटसाठी अर्ज येत असतात. ज्यांचे अर्ज येतात. त्यांना फायर अ‍ॅडिट करून दिले जाते. मनपाच्या सर्व शाळा व रूग्णांलयांचे दरवर्षी फायर अ‍ॅडिट केले जाते. मात्र खासगी शाळा, महाविद्यालये, रूग्णालये याकडे दुर्लक्ष करतात. धोका टाळण्यासाठी फायर अ‍ॅडिट करणे आवश्यक आहे.- पी. जे. उपगन्लावारअग्निशमन सल्लागार, मनपा चंद्रपूर.