शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

रस्त्यावर बैलबंडी ठेवाल तर भरावा लागेल दंड

By admin | Updated: February 24, 2015 01:56 IST

खतांचे ढिगारे, रस्त्यावर घाण, बैलबंडी, सांडपाणी, रस्त्यांवर गुरे आदी चित्र

रत्नाकर चटप ल्ल नांदाफाटाखतांचे ढिगारे, रस्त्यावर घाण, बैलबंडी, सांडपाणी, रस्त्यांवर गुरे आदी चित्र गावागावांत आपल्याला नेहमी बघायला मिळते. यामुळे अनेकवेळा आरोग्याच्या समस्याही निर्माण होते. आपले गाव स्वच्छ दिसावे, गाव रोगमुक्त व्हावा, यासाठी बाखर्डी येथील युवकांनी वसा हाती घेतला आहे. एवढेच नाही तर, रस्त्यावर बैलबंडी ठेवल्यास ५०० रुपयांचा दंड भरावा लागेल, असा ठरावच ग्रामसभेने घेतला आहे. जिल्ह्यात असा ठराव घेणारी कदाचित ही पहिलीच ग्रामपंचात असावी. या ग्रामपंचायतीचे अनुकरण अन्य ग्रामपंचायतीने केल्यास जिल्ह्यातील प्रत्येक गाव सुटसुटीत आणि रोगमुक्त होणार आहे.सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वत्र स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यात ग्रामीण परिसरही मागे नाही. कोरपना पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बाखर्डी या गावातील काही युवकांनी स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. प्रथम १० ते १५ युवकांनी पहाटे उठून रस्त्याची स्वच्छता करणे सुरु केले. त्यांचे कार्य बघून काही नागरिकांनीही यात सहभाग घेतला. बघता बघता स्वच्छता करणाऱ्यांचे हात वाढत गेले आणि आता तर गावातील महिलांनीही यात पुढाकार घेतला आहे. यातून गावातील रस्ते स्वच्छ केले जात आहे. विशेष म्हणजे, मागील अनेक वर्षांपासून नाल्यांमधील गाळ उपसण्याचेही काम युवकांनी हाती घेतले आहे. आता ग्रामसभेनेही यात पुढाकार घेतला आहे. यासाठी काही ठरावही मंजुर करण्यात आले आहे. या ठरावामध्ये रस्त्यावरील बैलबंडीसाठी ५०० रुपयांचा दंडाचा ठराव चर्चेचा विषय बनला आहे.गावात बैलबंडींची संख्या अधिक आहे. अनेकवेळा शेतकरी बैलबंडी रस्त्याच्या कडेला ठेवतात. बंडीला बैलांनाही बांधून ठेवल्या जाते. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. आता ठराव घेतल्यामुळे यावर प्रतिबंध आला आहे. काहींनी रस्त्यावर बैलबंडी ठेवणे बंद केले आहे. यामुळे रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले आहे. याचसोबत गाातील काही महिला रस्त्याच्या कडेला कपडे धुतात. यामुळे गावातील रस्त्यांवर पाणी साचते. यावर युवकांनी उपाय शोधला आहे. रस्त्यावर दिसणारे दगड हटविणे सुरु केले आहे. तर काहींना दगड हटविण्याची विनंती करण्यात आली आहे. गाव स्वच्छ करण्यासाठी युवकांनी घेतलेला पुढाकार वाखाण्याजोगा आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींनी असा पुढाकार घेतल्यास जिल्हा स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही.गाव स्वच्छ करण्यासाठी युवकांसह ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, महिला मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ तथा नागरिकांनीही सहभाग घेतला आहे.अन्य ग्रामपंचायतींनी घ्यावा ठराव४दिवसेंदिवस गावात वाहनांची संख्या वाढत आहे. त्यातच बैलबंडी, जनावरांनाही अगदी रस्त्यावर बांधून ठेवले जाते. यामुळे अनेकवेळा अपघातही होतात काही वेळी वाहतुकीची कोंडी होते. प्रत्येक ग्रामपंचायतींनी जर रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर दंड आकारला तर जिल्ह्यातील चित्र बदलले दिसेल. यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांनाही लागली सवय४गावात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यात विद्यार्थीही मागे नाही. शाळा परिसर किंवा रस्त्यावर कचरा दिसल्यास तो उचलून कचराकुंडीत टाकत आहे. या कामाला शिक्षकांचाही सहभाग मिळत आहे. त्यामुळे बालवयातच विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे येथे मिळत आहे. यासाठी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त समिती सदस्य, ग्रामसेवकानेही सहभाग घेतला आहे.परिसरातील नागरिकांचा संकल्प४बाखर्डी गावात स्वच्छता अभियान सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून गावातील चित्र बदलले आहे. आता परिसरात या गावाची चर्चा सुरु झाली आहे. काही ग्रामस्थ बाखर्डी येथे भेट देत आहे. आपल्याही गावात असे अभियान राबवू असा संकल्पही करीत आहे. कोरपना तालुक्यात ५३ ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतींनी सुद्धा स्वच्छता अभियान राबविणे आवश्यक आहे.