शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गैर आदिवासीत ऐश्वर्या मोटे तर आदिवासी गटात सुमित बिजे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 22:16 IST

राज्य विज्ञान शिक्षण संस्था व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ४४ वे जिल्हास्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शन माऊंट सायन्स महाविद्यालय येथे घेण्यात आले. या प्रदर्शनात एकाहून एक सरस प्रतिकृती विद्यार्थ्यांना सादर केल्या होत्या. यात प्राथमिक गैर आदिवासी गटात ऐश्वर्या माटे व आदिवासी गटात सुमित बिजे यांच्या प्रतिकृती प्रथम आल्या आहेत. प्रदर्शनात एकूण १९५ विज्ञान प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देएकापेक्षा एक सरस प्रतिकृती : जिल्हास्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : राज्य विज्ञान शिक्षण संस्था व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ४४ वे जिल्हास्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शन माऊंट सायन्स महाविद्यालय येथे घेण्यात आले. या प्रदर्शनात एकाहून एक सरस प्रतिकृती विद्यार्थ्यांना सादर केल्या होत्या. यात प्राथमिक गैर आदिवासी गटात ऐश्वर्या माटे व आदिवासी गटात सुमित बिजे यांच्या प्रतिकृती प्रथम आल्या आहेत. प्रदर्शनात एकूण १९५ विज्ञान प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या.‘जीवनातील आव्हानासाठी वैज्ञानिक उपाय’ या विषयावर हे प्रदर्शन असून त्या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रतिकृती बनविल्या होत्या. विज्ञानातून मानवाच्या दैनंदिन जीवनात कशी प्रगती करता येईल, या बाबती प्रतिकृतीतून भर देण्यात आला होता. या प्रदर्शनात उच्च प्राथमिक वर्ग ६ ते ८ गैरआदिवासी गटात प्रथम क्रमांक जि.प. उ.प्रा. शाळा मूर्तीची ऐश्वर्या एकनाथ मोटे हिने पटकावला. द्वितीय बल्लाजी हॉयस्कूल बामणीचा हर्षल सुरेश दुरतकर, तृतीय क्रमांक शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल नांदाफाटाची दिशा प्रफुल्ल दारवटकर हिने पटकावला. उच्च प्राथमिक वर्ग ६ ते ८ आदिवासी गटात प्रथम क्रमांक सुमित बालाजी बिजे याने पटकाविला. माध्यमिक वर्ग १ ते १२ गैरआदिवासी गटात प्रथम क्रमांक प्रेम गणपत देवगट्टा, द्वितीय साजल वाळके, तृतीय शिवाजी संतोष शिंपलीवार यांनी पटकाविला. आदिवासी गटात प्रथम क्रमांक शुभम देवाजी सातपुते यांनी पटकाविला. प्राथमिक शिक्षक गटात बाबा देवराव कोडापे व मनीष अशोक मांडवकर यांना संयुक्तपणे प्रथम क्रमांक देण्यात आला असून माध्यमिक शिक्षक व शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये सुरेशकुमार भगत, माध्यमिक शिक्षक लोकसंख्या शिक्षकमध्ये सलमा सप्तार कुरेशी व प्रायेगशाळा परिचर सहाय्यकमध्ये गणेश बदखल यांना प्रथम क्रमांक देण्यात आला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना समारोपीय कार्यक्रमात शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. संचालन अरुंधती गावटकर व आभार प्रदर्शन साधना केगतपूरे यांनी केले.