शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा शहरालगतच्या श्रीनगर सिटी परिसरात मूर्तीची विटंबना

By admin | Updated: August 19, 2015 01:18 IST

शहरालगतच्या श्रीनगर सिटी मधील मोकळ्या जागेत असलेल्या हनुमान मंदिरासमोर ठेवण्यात आलेल्या मूर्तीची विटंबना झाल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला.

वरोरा: शहरालगतच्या श्रीनगर सिटी मधील मोकळ्या जागेत असलेल्या हनुमान मंदिरासमोर ठेवण्यात आलेल्या मूर्तीची विटंबना झाल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विटंबना झालेल्या मूर्तीची विधीवत पूजा करुन स्थापना करण्यात आली. यावेळी घटनास्थळानजीक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.वरोरा शहरालगतच्या बोर्डा ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या श्रीनगर सीटी वसाहतीमध्ये मारोती काळे यांच्या शेतातील मोकळ्या जागेत हनुमानाचे मंदिर आहे. त्या मंदिरा समोरील ओट्यावर काही मूर्ती बसविण्यात आल्या आहेत. परिसरातील नागरिक या मंदिरात पूजा करीत असतात. मंदिराला २४ वर्षे पूर्ण झाली आहेत. १८ आॅगस्ट रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास विनोद काळे मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असता मूर्तीच्या विटंबनेचा प्रकार त्यांना दिसला. त्यांनी परिसरातील नागरिकांना व वरोरा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. नागरिकांच्या सहकार्याने विधीवत पूजा करुन मूर्तीची स्थापना करण्यात आली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जयस्वाल, पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांनी भेट देवून पाहणी केली. याच परिसरात रात्री एक वेडसर महिला फिरत होती याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्या दिशेने पोलीस तपास करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)