: स्वच्छ सर्वेक्षण २०२०
फोटो
बल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत शहरातील शैक्षणिक संस्था, व्यापार संकुल, निवासी तसेच होस्टेल क्षेत्र यांना नगर परिषदेकडून पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरणाचा सोहळा ऐतिहासिक किल्ला मैदानावर पार पडला. अध्यक्षस्थानी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, सभापती अरुण वाघमारे, माजी नगराध्यक्ष लखन चंदेले उपस्थित होते. शैक्षणिक क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब प्राथमिक शाळा, बियाणी, जुबली स्कूल, साईबाबा ज्ञानपीठ, शासकीय कार्यालयातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पोलीस स्टेशन, नगरपरिषद कार्यालय, महात्मा गांधी संकुल, बल्लारपूर बिझनेस सेंटर, वेंकटेश कॉम्प्लेक्स निवासी संकुलातून सारा रेसिडेन्सी, कृष्णा अपार्टमेंट हॉटेल देशी तडका हॉटेल, मेहर हॉटेल, ऊनी हॉटेल, रुग्णालयांमधून डॉ. बानोत, डॉ. कल्लूलवार, डॉ. मानवटकर यांना पुरस्कृत करण्यात आले. शहर स्वच्छतेकडे नगरपालिका प्रशासन लक्ष देते. नागरिकांनीही स्वच्छतेकडे लक्ष देऊन शहर स्वच्छ, सुंदर ठेवावे, हा या पुरस्कारामागचा हेतू असल्याचे नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी सांगितले. संचालन शब्बीर अली यांनी केले.