शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जलदूत घडविणार जलसाक्षर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:57 IST

जलसाक्षरता निर्माण करण्यासोबतच जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रम राबविण्यासाठी विभागीय जलसाक्षरता केंद्राची निर्मिती चंद्रपुरात होणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यासोबतच नागपूर महसूल मंडळातील अन्य जिल्ह्यांतून शेकडो जलसेवक व जलदूत घडविण्यात येणार आहेत. शासनाने या केंद्राची कार्यकक्षा नुकतीच जाहीर केली. प्रशासनाने योग्य अमलबजावणी केली तर भविष्यातील जलसंकटांवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजनेचे सूत्र जिल्ह्यातच गवसणार आहे.

ठळक मुद्देकेंद्राची कार्यकक्षा जाहीर : नागपूर महसूल मंडळातील जिल्ह्यांना चंद्रपुरातून प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जलसाक्षरता निर्माण करण्यासोबतच जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रम राबविण्यासाठी विभागीय जलसाक्षरता केंद्राची निर्मिती चंद्रपुरात होणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यासोबतच नागपूर महसूल मंडळातील अन्य जिल्ह्यांतून शेकडो जलसेवक व जलदूत घडविण्यात येणार आहेत. शासनाने या केंद्राची कार्यकक्षा नुकतीच जाहीर केली. प्रशासनाने योग्य अमलबजावणी केली तर भविष्यातील जलसंकटांवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजनेचे सूत्र जिल्ह्यातच गवसणार आहे.वाढती लोकसंख्या आणि पाण्याचा दुरूपयोग हा चिंतेचा विषय झाला आहे. नैसर्गिक जलस्त्रोत नष्ट होत असल्याने भविष्यात अनेक संकटे निर्माण होऊ शकतात. यातून मार्ग काढण्यासाठी शासनाने पुणे येथे यशदामार्फत मुख्य जल साक्षरता केंद्राची स्थापना केली होती. याशिवाय औरंगाबाद येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) स्थापन करून राज्यात जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु, विदर्भात अशा केंद्रांची उणीव असल्याने जलसाक्षरता मोहिमेला गती आली नव्हती. बहुतेक मोठे उपक्रम प्रामुख्याने विदर्भाबाहेरील जिल्ह्यांमध्येच राबविण्याकडे प्रशासकीय यंत्रणेचा कल होता. त्याचे अनिष्ट परिणाम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांवर झाले. दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपुरातील वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीच्या परिसरात विभागीय जलसाक्षरता केंद्र सुरू करण्याचे शासनाने जाहीर केले. या केंद्राची संकल्पना कार्यकक्षा, प्रशिक्षण, संशोधन, अभ्यास, प्रलेखन व सहाय्यकारी कामांचे स्वरूप कसे असावे, याविषयी शासनाने आराखडा तयार केला नव्हता. चार महिन्यांपूर्वी यासंदर्भात जलसंपदा विभागाने संक्षिप्त टिपण जाहीर केले होते. मात्र त्यामध्ये स्पष्टता नव्हती. त्यामुळे विभागीय जलसाक्षरता केंद्राविषयी सर्वसामान्य नागरिक जलतज्ज्ञ व शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. जलसंपदा विभागाने १९ सप्टेंबरला केंद्राची कार्यकक्षा जनतेपुढे ठेवली. नव्या आराखड्यानुसार केंद्रातून जिल्ह्यात शंभरपेक्षा अधिक जलकर्मी, जलदूत व जलनायक घडविण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे जलदूत गावपातळीवर जलप्रबोधनाचे काम करतील. त्यांना शासनाकडून मानधनही देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील जलसंकटांचा अभ्यास करून त्यावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यास जलदूतांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.समाजाभिमुख तरूणाईला संधीजलसेवक हा लिहिता-वाचता येणारा, समाजाभिमुख मूल्ये जोपासणारा व ग्रामसभेचा सदस्य असावा. त्यांच्या नामनिर्देशनाला ग्रामसभेची मान्यता असावी. शासनाच्या विविध विकास उपक्रमांविषयी जाणकार व्यक्ती, स्वच्छता दूत, स्वयंसहाय्यता गटातील उत्कृष्ट काम केलेल्या महिला, सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक, पाणलोट क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्ती, पाणी वापर संस्थामध्ये कार्य केलेल्या व्यक्ती, सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणाºया व्यक्ती अथवा स्वयंस्फुर्तीने पुढे येणाऱ्या व्यक्तींमधून नामनिर्देश करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर एक जलसेवकाची नियुक्ती होईल.