शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 22:26 IST

प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीची पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची खळबळजनक घटना चंद्रपूरपासून जवळच असलेल्या लोहारा येथे रविवारी रात्री घडली. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत २४ तासात आरोपी पत्नी, तिचा प्रियकर व अन्य एका साथीदाराला अटक केली. उत्तम पत्रुजी मडावी असे मृत पतीचे नाव आहे.

ठळक मुद्देलोहारा येथील घटना : तिघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीची पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची खळबळजनक घटना चंद्रपूरपासून जवळच असलेल्या लोहारा येथे रविवारी रात्री घडली. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत २४ तासात आरोपी पत्नी, तिचा प्रियकर व अन्य एका साथीदाराला अटक केली. उत्तम पत्रुजी मडावी असे मृत पतीचे नाव आहे.सुरेखा मडावी (३७) रा. लोहारा, जगदिश नथ्यू पाचभाई (४२), विशाल रुपराव धुटे दोघेही रा. बोथली असे अटकेतील आरोपींची नावे आहे.जगदिश पाचभाई हा लोहारा येथे उत्तम मडावी यांच्या घरी मागील पाच महिन्यांपासून किरायाने राहत होता. दरम्यान, त्याचे उत्तमची पत्नी सविता मडावी हिच्याशी प्रेमसंबंध जुळले. मात्र उत्तमला दारुचे व्यसन असल्याने तो आपल्या पत्नीशी नेहमी भांडण करीत होता. तसेच तो प्रेमसंबंधात व्यत्यय ठरत होता. त्यामुळे सुरेखाने आपल्या पतीचा काटा काढण्याचा डाव रचला. दरम्यान रविवारी जगदिशने आपला साथीदार विशालला लोहारा येथे बोलावले. त्यानंतर तिघांनी उत्तमला मारण्यासाठी सापळा रचून दोन दुचाकीने मूल येथे जेवण करण्यासाठी गेले. मूल येथे जेवण करुन परत येत असताना लोहाराजवळ थांबले. यावेळी जगदिशने मोठ्या काठीने उत्तमच्या डोक्यावर तीन वार केले. त्यामुळे उत्तमचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर दोघांनीही सर्व पुरावे नष्ट केले व तेथून पसार झाले. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी चौकशी सुरु केली. मृत उत्तमच्या पत्नीला विचारपूस केली असता, पोलिसांना वेगळाच संशय आला. यावेळी पोलिसांनी आपला हिसका दाखविताच पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंद केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नाईक यांच्या नेतृत्वात पोलीस निरिक्षक अशोक कोळी, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक दरेकर, पोलीस उपनिरिषक एस. डी. कापडे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक माऊलीकर यांच्यासह गुन्हे विभागाच्या चमूने केली.