शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर व गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागातील शेकडो गावे प्रकाशणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 11:25 IST

चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर जिल्ह्यात १ हजार १४६ नवीन वितरण रोहित्र उभारण्याचे काम सुरू झाल्याने आदिवासी भागातील शेकडो गावे प्रकाशमान होण्याची आशा निर्माण झाली.

ठळक मुद्देचंद्रपूर परिमंडळात उभारणार १ हजार १४६ नवीन वीज रोहित्र

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील वनव्याप्त दुर्गम, आदिवासी भागात वीज पुरवठा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, या दोन्ही जिल्ह्यात १ हजार १४६ नवीन वितरण रोहित्र उभारण्याचे काम सुरू झाल्याने अनेक वर्षांची समस्या दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात २०१४ मध्ये २ हजार ७८४ तर २०१४-१७ या वर्षात १ हजार ८२३ नवीन वितरण रोहित्र उभारण्यात आले. मात्र, नक्षलग्रस्त व जंगली भागातील शेकडो गावांना वीज पुरवठा करणे कठीण झाले होते. ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार वीज खांब उभारण्यासोबतच वितरण रोहित्रांची आवश्यकता पूर्ण करताना समस्येला तोंड देण्याची वेळ वीज वितरण कंपनीवर आली. दरम्यान, महावितरणने पायाभूत विकास आराखड्याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ३६७ रोहित्र उभारण्याचा निर्णय घेतला. यातील ५० टक्के कामे पूर्ण झाले असून उर्वरित कामे सुरू आहेत. याशिवाय, २६ वितरण रोहित्रची क्षमता वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले. उच्चदाब तसेच लघुदाब वाहिनी, ३३/११ केव्ही नवीन उपकेंद्र व अतिरिक्त रोहित्रची गरज लक्षात सुमारे ८२ कोटींच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील शेकडो गावे प्रकाशमान होण्याची आशा निर्माण झाली. चंद्रपूर जिल्ह्यातही ७७९ रोहित्रची कामे सुरू असून १४० वितरण रोहित्रच्या क्षमतेत वाढ केली जात आहे.४० हजार नागरिकांपर्यंत पोहोचणार ग्रामज्योतीदिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत चंद्रपूर १३ हजार ६३२ आणि गडचिरोली जिल्ह्यात २६ हजार २३८ असे एकून ३९ हजार ८६० दारिद्रय रेषेखालील नागरिकांना नवीन वीज जोडणी देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.आदिवासी शेतकऱ्यांचा कृषिपंपाकडे कलगडचिरोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत १७ हजार १४८ कृषिपंप सुरू आहेत. कृषि संजीवनी योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचीही संख्या लक्षवेधी असून मागील महिन्यात वीज बिलातील त्रुटी दूर करण्याची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये तक्रारी दूर झाल्याने १ हजार ७३२ आदिवासी शेतकऱ्यांनी कृषिपंपासाठी अर्ज केले. मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी मंजुरी प्रदान केल्याने ही कामेही लवकरच सुरू होणार आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरण