शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्हाला गावाला जाऊ द्या’ आक्रोश करीत शेकडो बांधकाम मजूर चंद्रपूर-हैद्राबाद महामार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 20:35 IST

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामावरील शेकडो मजूर शनिवारी सकाळी चंद्रपूर - हैद्राबाद मार्गावर येऊन आमचे वेतन द्या..आम्हाला गावाला जाऊ द्या.. असा आक्रोश करू लागले. कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर अचानक झालेल्या या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामावरील शेकडो मजूर शनिवारी सकाळी चंद्रपूर - हैद्राबाद मार्गावर येऊन आमचे वेतन द्या..आम्हाला गावाला जाऊ द्या.. असा आक्रोश करू लागले. कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर अचानक झालेल्या या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर या मजुरांची मागणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पूर्ण करण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड व इतर राज्यातील हा मजूरवर्ग गेल्या तीन-चार महिन्यांपासून चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारती बांधकामावर मजुरीचे काम करीत होता. लॉकडाऊनमुळे हे मजूर येथेच अडकून पडले आहेत. त्यांनी सोबत आणलेले पैसेही आता संपले आहे. अशातच तिसऱ्यांदा देशात लॉकडाऊन वाढविल्यामुळे या मजुरांची चांगलीच अडचण झाली. त्यांना मजुरीची रक्कमही मिळाली नाही. लॉकडाऊननंतर घरी पाठविण्यासाठी शापूरजी पालनजी या कंत्राटदार कंपनीने प्रत्येकांना काही रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ही रक्कमही अद्याप मिळाली नाही, असा या मजुरांचा आरोप आहे.काहीच जवळ नसल्यामुळे या मजुरांची उपासमार सुरू झाली. तिकडे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहे. त्यांच्याकडेही पैसा पाणी नाही. अशा परिस्थितीत आपण कसे जगायचे आणि कुटुंबांना कसे जगवायचे, असे बिकट प्रश्न या मजुरांना भेडसावू लागले. अखेर त्यांच्या सहनशिलतेचा बांध आज फुटला. बांधकामावरील शेकडो मजूर अचानक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून जाणाºया चंद्रपूर-हैद्राबाद मार्गावर येऊन आक्रोश करू लागले. या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने आंदोलनस्थळी धाव घेऊन आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र ठोस आश्वासनाशिवाय आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी धाव घेऊन आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र तोही सुरुवातीला विफल झाला. अखेर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या मार्फतीने आंदोलकांची घरी जाण्याची मागणी मान्य करण्यात आली. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या मजुरांना सोमवारी त्यांच्या राज्यात परत पाठविण्याची जबाबदारी कंत्राटदार कंपनी शापूरजी पालनजीवर सोपविली आहे. प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरंभण्यात आली आहे.शापूरजी पालनची या कंत्राटदार कंपनीच्या वतीने हा मजूरवर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामावर काम करीत होता. त्यांना आपल्या गावाला जायचे आहे. त्यांना गावाला पाठविण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदार कंपनीवर सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांना गावाला पाठविण्याचे प्रशासकीय सोपस्कार पूर्ण केले जात आहे.- डॉ. एस. एस. मोरे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर.कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा - विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचंद्रपूर येथे चंद्रपूर-हैद्राबाद महामार्गावर शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे बांधकामावर असलेले बाहेर राज्यातील मजूर लॉकडाऊनमुळे अडकलेले आहेत. त्यांच्या कंत्राटदाराने त्यांचे वेतन दिले नाही. जेवनाची व्यवस्थासुध्दा केली नाही. त्यामुळे कामगारात असंतोष निर्माण झाल्याने या कामगारांना आंदोलन करावे लागले. यानंतर जिल्हा पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी त्यांच्या जाण्याची व्यवस्था करून देण्यात येईल. तसेच थकीत असलेले पगार मिळवून देऊ , असे आश्वासन दिले असले तरी बेजबाबदारपणे वागणाºया संबंधित कंत्राटदार कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेसतर्फे कामगार नेते नरेश पुगलिया यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस