शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
2
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
3
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
4
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
5
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
8
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
9
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
10
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
11
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
12
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
13
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
14
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
15
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
16
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
17
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
18
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
19
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
20
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप

बैल पोळा उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 22:42 IST

ग्रामीण भागात पोळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यांत्रिक युगात जनावरांची संख्या कमी होत आहे. परंतु या सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना बैलजोडीविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही. पेंढरी (कोके) येथे या सणाला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाले आहेत. सामूहिक सण साजरा करण्याची ही परंपरा नवी पिढी पुढे नेण्यास सरसावली आहे.

ठळक मुद्देकृतज्ञतेने होते पूजन : पेंढरी (कोके) येथे पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल

लोकमत न्यूज नेटवर्कपेंढरी कोके : ग्रामीण भागात पोळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यांत्रिक युगात जनावरांची संख्या कमी होत आहे. परंतु या सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना बैलजोडीविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही. पेंढरी (कोके) येथे या सणाला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाले आहेत. सामूहिक सण साजरा करण्याची ही परंपरा नवी पिढी पुढे नेण्यास सरसावली आहे.शंभर वर्र्षांपूर्वी तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण शिंदे, गुलाबराव घोरपडे, नारायण सुर्यवंशी, तुकाराम शेंडे, सिताराम शेंड,े मारोती आत्राम, वारलू मेश्राम, मारोती चनुरकार, श्रावण वाढई देवाजी निकोडे, सोनबाजी नान्ने, चिरकुटा आत्राम, नामदेव चौधरी, झिबल मेश्राम आदींनी गावातील विठ्ठल रूख्मिनी व हनुमान देवस्थानच्या पारावर बैलपोळा सुरू केला. त्यावेळी पाटलांच्या दहा व इतर शेतकºयांच्या दोन अथवा तीन जोड्या अशा तिनशेपेक्षा अधिक बैल तोरण रांगेत असायचे. त्यानंतरची धुरा दुसºया फळीतील वारसदार नारायण मेश्राम, चंपत शेंडे, सखाराम शेंडे, माणिकराव गुरनुले, महादेव वाढई, पुंजाराम आत्राम, शामराव आत्राम नानाजी निकोडे, दादाजी चौधरी, चंद्रकांत शिंदे, गणपत सुर्यवंशी, तुकाराम सुर्यवंशी, पांडुरंग शेंडे, मनिराम सुर्यवंशी, रामराव आत्राम, रामाजी आंबडारे, गोपाळराव चौखे, किसन सोनुले, केशवराव गायकवाड, श्रावण चाचरकार, मनिराम चौखे, हरीजी चौखे नथ्थूजी परात, मोतीराम खंडरे, महादेव सहारे, पांडुरंग मेश्राम ही परंपरा पुढे नेली. बैल जोड्यांची संख्या दीडशे व दोनशेपर्यंत अबाधित ठेवली. तिसºया पिढीतील यादवराव मेश्राम, लिलाधर चनुरकार, गुलाबराव आत्राम, वासुदेवराव आत्राम, मंगेश शिंदे, माणिक शेंडे, रमेश शेंडे, गुरूदास आत्राम, रतिराम आत्राम, शालिकराम आत्राम, रामदास सहारे, नारायण गुरनुले, देवाजी चौधरी, देवाजी गुरनुले, रामीज चाचरकर, भगवान चौधरी, जैराम आत्राम, दौलत जनबंधू, वामन शेंडे, श्रीराम मेश्राम, यशवंत पराते, घनश्याम चौखे, पांडूरंग गुरनुले, श्रावण गुरनुले, उद्धव बावणे आदी मंडळी परंपरा चालवित आहेत. मागील वर्षी पेंढरीच्या पोळ्यात केवळ ५३ ते ५७ तर कोकेवाडा व मुरपार येथील पोळ्यात सुमारे ७५ बैलजोड्या उपस्थित होत्या.