शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थीच नसताना बँकेत कसे जमा झाले ४६ लाखांचे अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 13:33 IST

वरोरा बाजार समितीत गैरव्यवहार : सचिवांचे प्रशासकीय अधिकार काढले

प्रवीण खिरटकरलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्यासाठी दरवर्षी तारण योजना राबविते. मात्र ज्या शेतकऱ्यांनी शेतमालच ठेवला नाही त्यांच्याही बँक खात्यात ४६ लाख रूपये जमा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर सचिवांचे प्रशासकीय अधिकार काढले असून दोषी कर्मचाऱ्यांचे दाबे दणाणले आहे.

शेतमाल निघाल्यानंतर शेतमालाचे दर कमी असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विकताना दर कमी मिळतो. शेतमालास अधिकाधिक दर मिळावा, याकरिता तारण योजना राबविली जाते. या योजनेत शेतकऱ्यांनी शेतमाल ठेवल्यास त्यांना तत्काळ ७५ टक्के रक्कम त्यांच्या बँक खात्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत जमा केली जाते. वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीनेही ही योजना राबविली. योजनेंतर्गत ठेवलेला शेतमाल घेतल्यानंतर उर्वरित २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिले जाते. योजनेत शेतमाल ठेवल्यानंतर संरक्षण करण्याची जबाबदारी बाजार समितीकडे असते. शेतकऱ्यांच्या घरी शेतमाल ठेवण्याचे अडचणी येतात. शिवाय घरात शेतमाल ठेवल्याने प्रतवारी घसरू शकते. प्रतवारी शेतमालाची घसरली तर शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागतो. त्यामुळे शेतकरी तारण योजनेला मोठ्या प्रमाणात पसंती देतात. मात्र, वरोरा बाजार समितीत काही शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होता त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली.

यापूर्वी गाजला होता कांदा अनुदान घोटाळाचंद्रपूर जिल्ह्यात कांदा हे पीक अतिशय नगण्य प्रमाणात घेतले जाते. तरीही वरोरा बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या ६७६ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारे २ कोटी ३० लाख रुपये अनुदान जमा झाले होते. कांद्यावर मिळणारे अनुदान लाटण्यासाठी ६५ हजार क्विटल कांदा खरेदी केल्याचे दाखवले. याप्रकरणी दोषींना शिक्षा झाली होती.

असा झाला गैरव्यवहारवरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती मोहबाळा मार्गावरील मुख्य बाजार व उपबाजार शेगाव येथे तारण योजना राबविली जाते. शेतकऱ्यांनी या दोन ठिकाणी शेतमाल ठेवल्यानंतर मालाचे नाव व वजन शेतकऱ्यांच्या बैंक विवरणाची माहिती बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात पाठविली जाते. त्यानंतर संबंधित यादी संगणकावर तयार करून सचिव व सभापतींची स्वाक्षरी करतात. त्यानंतर रोखपाल शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे डिटेल्स घेऊन धनादेश तयार करतो. त्यावर सचिव व सभापतींची स्वाक्षरी घेतली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होते. मात्र, शेतमाल न विकता काहींच्या खात्यात रक्कम झाली. संगणकावर यादी तयार करताना हा गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.

"तारण योजनेतील हा गैरव्यवहार उघडकीस येताच बाजार समिती संचालक मंडळाने विद्यमान सचिव चंद्रसेन शिंदे यांचे प्रशासकीय अधिकार काढले. बाजार समितीच्या एका अधिकाऱ्याकडे हा अधिकार सोपविण्यात आला. अंकेक्षण अहवालातून हा गैरव्यवहार उघडकीस आला. स्थानिक पातळीवर चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू."- विजय देवतळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, वरोरा 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीchandrapur-acचंद्रपूर