शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

पाच हजारांच्या मदतीवर कसे उभारावे घर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 05:00 IST

सुरुवातीच्या टप्प्यात घरात पाणी शिरल्याने लोकांना खाण्यासाठी काहीच पर्याय नव्हता. तोपर्यंत जेवण, कपडे, आश्रय देणे आवश्यक होते. आता पूर ओसरला असून पूरग्रस्त आपापल्या गावातील आपल्या घरी पोहोचले आहेत. त्यांना दोन तीन महिने पुरेल एवढे धान्य, कपडे, अंथरूण, पांघरूण पुरेसे आहे. अजूनही धान्य कपडयांच्या मदतीचा ओघ सुरूच आहे.

ठळक मुद्देनिवारा देण्याची मागणी : तोकड्या मदतीमुळे पूरग्रस्त चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुक्यातील अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांसाठी अनेकजण मदतीला धावून आले. त्यात प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक व राजकीय संस्था आदींनी आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करीत पूरग्रस्तांना धीर देण्याचा प्रयत्न केला. पण आता खरी गरज आहे ती पडलेल्या घरांच्या उभारणीची. शासनाने पडझड झालेल्या पूरग्रस्तांना पाच हजारांचे वाटप केले असले तरी त्यात घर कसे उभारायचे, असा प्रश्न पूरग्रस्त कुटुंबासमोर निर्माण झाला आहे.त्यामुळेच आता इतर कोणत्याही प्रकारची मदत नाही मिळाली तरी चालेल पण निवारा द्या, अशी आर्त हाक पूरग्रस्त देत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात घरात पाणी शिरल्याने लोकांना खाण्यासाठी काहीच पर्याय नव्हता. तोपर्यंत जेवण, कपडे, आश्रय देणे आवश्यक होते. आता पूर ओसरला असून पूरग्रस्त आपापल्या गावातील आपल्या घरी पोहोचले आहेत. त्यांना दोन तीन महिने पुरेल एवढे धान्य, कपडे, अंथरूण, पांघरूण पुरेसे आहे. अजूनही धान्य कपडयांच्या मदतीचा ओघ सुरूच आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत ज्यांची घरे पुर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांना अन्नधान्य, कपडयांच्या गरजेपेक्षा महापुराने उदध्वस्त झालेल्या घरांना पुन्हा उभारण्याची गरज अधिक आहे. हीच त्यांची खरी गरज असून ते आशाळभूतपणे प्रशासनाकडे, शासनाकडे नजरा लावून बसले आहेत. उद्ध्वस्त झालेल्या घराच्या नव्याने बांधणीसाठी त्वरित शासनाकडून निधी उपलब्ध होईल आणि आपल्याला आपल्या डोईवरचा छत उभा करता येईल, या आशेवर तर जगत आहेत.शासनाकडून तत्काळ पाच हजार रुपयांची मदत मिळाली आहे. आणखी काही रुपये पूरग्रस्तांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. परंतु एवढयाने उद्ध्वस्त झालेली घरे उभी राहणार का, शासनाची पुढील मदत येईपर्यंत आसरा कुठे घ्यायचा, भविष्यात कसे होईल, या विवंचनेत पुरात उदध्वस्त झालेल्या घरांच्या कुटुंब प्रमुख आहेत. अख्खे कुटुंबीय चिंताग्रस्त बनली आहेत. पोटात भूक लागते परंतु उद्याच्या चिंतेने अन्नाचा घास पोटात जात नाही. रात्रभर त्यांना झोपही येत नाही, अशी विचित्र अवस्था त्यांची झाली आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्था, उद्योगपतींनी, लोकप्रतिनिधींनी आता निवारे उभे करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.प्रभावित गावांना समान वाटप करणे गरजेचेविशिष्ट एका गावात फार मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे म्हणून इतर प्रभावित झालेल्या गावांना वाऱ्यावर सोडून काही विशिष्ट अशा दोन-चार गावातच मदतीचा ओघ सुरू आहे. काही गावात मदतीचा महापुर सुरू आहे.पण महापुराने प्रभावित झालेली तालुक्यातील अशीही काही गावे आहेत, त्या ठिकाणी बºयाच मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. परंतु त्या गावांना आजतागायत कोणीही भेट देऊन त्यांचे सांत्वन केले नाही. फक्त सर्व्हेच्या माध्यमातून शासकीय मदत पोहचली आहे. इतरांचे फारसे लक्ष काही गावांकडे जातांना दिसून येत नाही.दोन मतदारसंघ विभाजनाचा पूरग्रस्तांना फटकातालुक्यातील पूरग्रस्त गावे दोन विधानसभा मतदारसंघात विभागली असल्याने लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मदत देताना आपले उद्याचे राजकीय भविष्य लक्षात घेऊन पूरग्रस्तांना मदत देत आहेत. हा पूरग्रस्त आपल्या पक्षाचा नाही म्हणून अशा पूरग्रस्तांना काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी डावलले असल्याचे प्रकार तालुक्यात घडले आहेत. अशा गंभीर परिस्थितीत मानवीय दृष्टीकोनातून खºया गरजूपर्यंत मदत पोहचणे आवश्यक आहे.

टॅग्स :floodपूर