शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांकरिता विदर्भात बांधणार वसतिगृह : मकरंद अनासपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:36 IST

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर पडल्यास पाल्यांचा शिक्षणाचा प्रश्न बिकट होतो.

आॅनलाईन लोकमतवरोरा : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर पडल्यास पाल्यांचा शिक्षणाचा प्रश्न बिकट होतो. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण व्हावे, याकरिता नाम फाऊंडेशनच्या वतीने विदर्भात वसतिगृह सुरू आहे, अशी माहिती सिनेकलावंत मकरंद अनासपुरे यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.भद्रावती येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित ‘उलट सुलट’ नाट्यप्रयोगासाठी आमदार बाळू धानोरकर यांच्या वरोरा येथील निवासस्थानी भेट दिली होती. मकरंद अनासपुरे म्हणाले, नाना पाटेकर आणि मी नाम फाऊंडेशनची स्थापना केली. कोरडवाहू शेतकऱ्यांकरिता आम्ही लोकसहभागातून काम करीत आहोत. लोकसहभागातून सिंचनाची वाढ झाल्यास शेतकरी दोन पिके एका वर्षात घेवून समृद्ध होवू शकतील. यातून आत्महत्येचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. लोकसहभागामुळे या उपक्रमाचे महत्त्व समाजाला कळेल, असेही अनासपुरे यांनी नमूद केले.मराठवाडा, आणि कोकणात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय वसतिगृहातून केली आहे. आज शेकडो मुले इयत्ता १ ते १० पर्यंत शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पुढील शिक्षणाचीही मोफत व्यवस्था लोकसहभागातून करण्यात येणार आहे. नाम फाऊंडेशनच्या कामाला विदर्भातही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून अनासपुरे म्हणाले, गावखेड्यातील राजकारण निवडणुकीपर्यंत मर्यादित रात नाही. मोठे नेते एकमेकांच्या गळ्यात गळा मिळवितात. तर लहान कार्यकर्ते राजकारण करून विकास कामांमध्ये बाधा आणतात.देशात बाबा आणि बुवा खुप आहेत. त्यामुळे आपल्याला देवपण नको आहे. त्यासाठीच एकदा ज्या ठिकाणी काम झाले. तिथे आम्ही जावून सत्कारही स्वीकारत नाही. कामाची उभारणी झाल्यानंतर नागरिकांनी ते पुढे नेले पाहिजे, अशी नाम संघटनेची भूमिका आहे, याकडेही मकरंद अनासपुरे यांनी लक्ष वेधले.