शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरी तलाव ‘ओव्हरफ्लो’च्या टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 00:12 IST

पूर्व विदर्भात पर्यटकांचे आकर्षण ठरलेला घोडाझरी तलाव आता ओव्हरफ्लोच्या टप्प्यात आला आहे. याकरिता आणखी पावसाची गरज आहे. हा तलाव ओव्हरफ्लो झाल्यास पर्यटकांची मोठी गर्दी वाढू शकते.

ठळक मुद्देमुसळधार पावसाची प्रतीक्षा : २०१३ पासून झाला नाही ओव्हरफ्लो

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : पूर्व विदर्भात पर्यटकांचे आकर्षण ठरलेला घोडाझरी तलाव आता ओव्हरफ्लोच्या टप्प्यात आला आहे. याकरिता आणखी पावसाची गरज आहे. हा तलाव ओव्हरफ्लो झाल्यास पर्यटकांची मोठी गर्दी वाढू शकते.तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाची सोय व्हावी, याकरिता इंग्रजांनी १९०५ रोजीे घोडाझरी तलावाची निर्मिती केली. या तलावामुळे सिंदेवाही व नागभीड तालुक्यातील १५ हजार एकर शेतीला लाभ होत आहे. सिंचनासोबतच तलावाचा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो पर्यटक पावसाळ्यात तलावावर येतात. घोडाझरीला भेट देण्याची मजा काही औरच असते. तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर सांडव्यावरून फेसाळलेले ओसंडून वाहणारे पाणी, ठिकठिकाणचे लहान धबधबे, तुडूंब जलाशय, तिन्ही बाजूला नैसर्गिक टेकड्या आणि टेकड्यांवरील हिरवी गर्द वनराई हे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. निसर्गाचे हे लोभस रूप डोळ्यात साठविण्यासाठी पर्यटकांची पावले घोडाझरी तलावाकडे वळतात. परंतु, पाच वर्षांपासून हा तलाव ओव्हरफ्लो झाला नाही. २०१३ रोजी शेवटचा ओव्हरफ्लो झाला होता.

टॅग्स :Ghodazari Damघोडाझरी धरण