शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरी सांडव्याखालचे दगड पर्यटकांसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:38 IST

घोडाझरी तलावाच्या सांडव्याखाली विखुरलेले दगड पर्यटकांना धोकादायक ठरत आहेत. संबंधित विभागाने हे दगड त्वरित उचलून पर्यटकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. पाच वर्षांनंतर प्रथमच घोडाझरी तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : घोडाझरी तलावाच्या सांडव्याखाली विखुरलेले दगड पर्यटकांना धोकादायक ठरत आहेत. संबंधित विभागाने हे दगड त्वरित उचलून पर्यटकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.पाच वर्षांनंतर प्रथमच घोडाझरी तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. तलाव ओव्हरफ्लोचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. सांडव्यावरून फेसाळत पडणाऱ्या पाण्यात पर्यटक मनसोक्त डुंबतात. मात्र नेमक्या याच जागी हे दगड मोठ्या प्रमाणावर विखुरले आहेत. हे दगड पर्यटकांना जीवेघेणे ठरत आहेत. पाच वर्षांत घोडाझरी तलावाच्या ओव्हरफ्लोने हुलकावणी दिली होती. या दगडांकडे संबंधितविभागाने लक्ष गेले नाही. यंदा प्रथमच हा तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या उंबरठ्यावर आहे. या परिसरात पाऊस पडल्यास ओव्हरफ्लो होण्याला केवळ एक फुट अंतर शिल्लक आहे. खरीप शेतीचा हंगाम सुरू असला तरी सद्यस्थितीत शेतकऱ्यांना पाण्याची गरज नाही. त्यामुळे घोडाझरी तलाव कोणत्याही क्षणी ओव्हरफ्लो होऊ शकतो. ओव्हरफ्लो झाला नाही तरी पर्यटक दररोज सांडव्यावर येत आहेत. जिल्हाबाहेरील पर्यटकही कुटुंबासह घोडाझरी तलावावर येऊ लागले आहेत. काही दिवसात ओव्हरफ्लो होताच या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी उसळणार आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन सिंचन विभागाने धोका दगड तातडीने उचलावे, अशी पर्यटकांची मागणी आहे.

टॅग्स :Ghodazari Damघोडाझरी धरण