शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरी अभयारण्याच्या निर्मितीने पर्यटनाला वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:16 IST

घोडाझरी या चिमूर विधानसभा क्षेत्रातील नवीन अभयारण्याच्या निर्मितीने या परिसरात पर्यटनाला, तसेच पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. त्यामुळे रोजगारनिर्मिती होऊन येथील नागरिकांचे जीवनमान उंचावेल, ....

ठळक मुद्देकीर्तीकुमार भांगडिया : वार्तालाप कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : घोडाझरी या चिमूर विधानसभा क्षेत्रातील नवीन अभयारण्याच्या निर्मितीने या परिसरात पर्यटनाला, तसेच पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. त्यामुळे रोजगारनिर्मिती होऊन येथील नागरिकांचे जीवनमान उंचावेल, अशी माहिती या अभयारण्यांच्या निर्मितीसाठी पाठपुरावा करणारे चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ. कीर्तीकुमार भांगडिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.नुकतीच घोडाझरी या नवीन अभयारण्यांच्या निर्मितीसाठी शासनाने मान्यता प्रदान केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आ. भांगडिया यांनी संवाद साधला. आ. भांगडिया म्हणाले, घोडाझरी हे नैसर्गिक संपदेने नटलेले, अलौकिक वनवैभव लाभलेले एक उत्कृष्ट पर्यटनस्थळ आहे. विपूल वनसंपदेमुळे या अभयारण्याची ओळख जागतिक स्तरावर व्हावी, यासाठी या पर्यटनस्थळाचा आदर्श असा विकास करण्यात येईल. येथे चांगल्या दर्जाच्या सोई सुविधा निर्माण करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.वनविभागाने पुढाकार घेऊन या अभयारण्याच्या विकासाचा आराखडा लवकरात लवकर तयार करावा, मुख्य मार्गालगत हे अभयारण्य असल्यामुळे या ठिकाणी सर्व दिशांकडून पोहोचणे सोयीचे आहे. जंगल सफारी आणि व्याघ्र पर्यटनासाठी राज्यभरातील नागरिक मोठ्या प्रमाणात घोडाझरी येथे येतील, असे ते म्हणाले.