शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

हिरापूर येथे घरकूल घोटाळा

By admin | Updated: December 2, 2015 00:56 IST

प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून विविध योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करवून घेतली जात आहे.

कारवाईची मागणी : बांधकाम न करता लाखो रुपयांची उचलआंबोली : प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून विविध योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करवून घेतली जात आहे. मात्र असे असतानाही ग्रामपंचायत स्तरावर नियोजन अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांनी घरकुल बांधकामात गैरव्यवहार केल्याचा प्रकार आंबोलीपासून सात किमी अंतरावर असलेल्या हिरापूर येथे घडला आहे. माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीतून हा प्रकार उजेडात आला. हिरापूर येथील २३ कुटूंबांना सन २०११-१२ ते सन २०१२-१३ या वर्षात शासनाच्या सामाजिक न्याय व नवबौद्ध घटक योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. मंजूर घरकुलाचे बांधकाम पंचायत समिती चिमूर व ग्रामपंचायतच्या देखरेखीत करण्यात येते. काही घरकुल लाभार्थ्यांना आबादी जागेतील प्लॉट देण्यात आले काहींना स्वत:ची जागा आहे तर काही लाभार्थ्यांनी झुडपी जंगल नमूद असलेल्या जागेवर अतिक्रमण केले. या जागेवर २३ घरकूल लाभार्थ्यांपैकी १२ लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम केलेले नाही. प्रत्येक लाभार्थ्यांना मिळालेल्या घरकुलाचा धनादेश ६९ हजार ३०४ रुपये याप्रमाणे प्रत्येकी १२ घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम न करता रक्कम देण्यात आली. तसेच झुडपी जंगल गवत महाराष्ट्र शासन वनविभाग असे नमूद असलेला सातबारा भु.क्र. २५४ आराजी १०.७६ हे.आर. नोंद असलेल्या या झुडपी जंगल जागेवर आठ लाभार्थ्यांनी अतिक्रमण करून घरकुलाचे बांधकाम केले आहे. या गैरप्रकरणाची तक्रार संवर्ग विकास अधिकारी चिमूर यांच्याकडे यापूर्वी करण्यात आली. पण अजूनपर्यंत साधी चौकशीही करण्यात आलेली नाही. येथील नाजूक अर्जून वाकडे हे पुणे येथे नोकरी करीत आहेत. त्यांनाही घरकुल मंजूर झाले. मात्र बांधकाम न करता ६९ हजार ३०४ रुपये असा निधी उचलण्यात आल्याचे दिसून येत आहे. तर शेवंता बापूराव वाघमारे ही मयत असून तिच्या नावे २५ हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला. बांधकाम मात्र अजुनही झाले नाही.शामराव फागो नागदेवते, बाळा भदू वाकडे, प्रभू वाकडे, बंडू विठोबा वाकडे, वामन किसन डांगे, भाष्कर नामदेव धनविजय, बालकदास गुलाब वाघ, बापुराव महादेव वाकडे, अनिल शंकर मुनघाटे, सदाशिव गोदरू वाकडे या लाभार्थ्यांनी प्रत्येकी ६९ हजार ३०४ रुपयाचे धनादेश घेवून शासनाची फसवणूक केली. घरकुल योजना १०० रुपयाच्या मुद्रांक शुल्कावर शपथपत्र तयार करून त्यात स्वत:ची जागा, घर टॅक्स पावती कर आकारणी हे सर्व पुरावे जोडून शपथपत्र तयार करू दिल्या जाते. त्या करारनाम्यावर सरपंच, लाभार्थी व साक्षदारांच्या स्वाक्षऱ्या घेवून त्या आधारावर घरकूल निधी दिला जातो. परंतु, हिरापूर येथे एकूण २३ लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामात आठ लाख ७३ हजार ४० रुपये एवढ्या रुपयाचा गैरप्रकार झाला आहे. (वार्ताहर)