चंद्रपूर :पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणाऱ्या जिल्हातील होमगार्डंचे पाच महिन्यांचे मानधन रखडले आहे. त्यामुळे अडचणीच्या या दिवसामध्ये जगायचे कसे असा प्रश्न ते उपस्थित करीत आहे. विशेष म्हणजे, कोरोणा काळातही त्यांची मदत घेण्यात आली होती. मात्र या दिवसाचेही मानधन अडले आहे. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळताना पोलीस प्रशासन होमगार्डची मदत घेते. सण, उत्सव, निवडणूक, मिरवणुकीप्रसंगी होमगार्डची मदत घेत परिस्थती सांभाळली जाते. तपास यंत्रणेचा भाग सोडला तर बंदोबस्ताची अनेकवेळा जबाबदारी होमगार्डवर सोपविल्या जाते. मात्र मिळणारे मानधन वेळेत मिळत नसल्याने त्यांना आर्थिक विवंचनेला सामोरे जाव लागत आहे. विशेष म्हणजे, होमगार्डना पूर्णवेळ काम मिळत नाही. ज्या दिवशी काम केले त्याच दिवसीची रोजी दिली जाते. मात्र तिही वेळेवर मिळत नसल्याचे होमगार्डचे म्हणणे आहे. कोरोना काळात नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये काम करूनही या महिन्यांचेही मानधन रखडले आहे. तर अन्य दोन महिन्याचेही मानधन मिळाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पूर्वी होमगार्डने नियमित काम मिळत होते. आता केवळ सण, उत्सव, मिरवणुकीदरम्यान काम मिळते. त्यामुळे या दिवसात ते आपले काम इनामे-इतबारे करीत आहेत. तर काही जण अन्य दुसरेही काम करून उदरनिर्वाह करीत आहेत. त्यामुळे केलेल्या कामाचे वेळेवर दाम मिळावे, अशी अपेक्षा जिल्ह्यातील होमगार्डने व्यक्त केली आहे.
बाॅक्स
सण उत्सवामध्ये नियुक्ती
पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी तसेच सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी होमगार्डची संबंधित ठिकाणी नियुक्ती केली जाते. कोरोना काळामध्येही होमगार्डनी आपले कर्तव्य चोखपणे बजावले. मात्र या काळातीलही मानधन रखडले आहे. किमान या कठीण दिवसामधील मानधन तरी वेळेवर द्यावे, अशी त्यांनी मागणी केली आहे.
बाॅक्स
१०४५
जिल्ह्यातील होमगार्डी संख्या
-
०५
महिन्यांचे मानधन थकीत
--
कोट
होमगार्डच्या रखडलेल्या वेतनाविषयी शासनस्तरावर पाठपुरावा सुरु आहे. अनुदानमिळताच त्यांचे मानधन अदा करण्यात येणार आहे.
- अविनाश खैरे
जिल्हा समादेशक, चंद्रपूर