शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:56 IST

सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने शनिवारी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे, निदर्शने आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : सातवा वेतन आयोग लागू करा

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने शनिवारी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे, निदर्शने आंदोलन करण्यात आले.राज्य शासनाचे धरसोडीचे शैक्षणिक धोरण व शिक्षक विरोधी भूमिका घेतल्याने राज्यात शैक्षणिक असंतोष वाढला आहे. राज्यातील खासगी व स्थानिक संस्थांतर्गत माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. राज्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी केंद्र शासनाप्रमाणे १ जानेवारी २०१६ पासून लागू कराव्यात, २० टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या राज्यातील सर्वच शाळांना वर्ग तुकड्यांना त्या पुढील टप्पा अनुदान विनाअट मंजूर करणे, तसेच निकषपात्र विना अनुदानीत शाळा-वर्गतुकड्यांना सरसकट अनुदान मंजूर करण्यात यावे, अंशदायी पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना लागू करावी, राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी लागू करावी, २३ आॅक्टोबर २०१७ चा जाचक शासन निर्णय रद्द करावा, सर्व अतिरिक्त शिक्षकांचे त्वरित समायोजन करावे आदी मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.यावेळी सरकार्यवाहक सुधाकर अडबाले, जगदिश जुनगरी, जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, लक्ष्मणराव धोबे, श्रीहरी शेंडे, दिगांबर कुरेकर, सुनील शेरकी, वसुधा रायपूरे, अनिल कंठीवार, शालिक ढोरे, नितीन जीवतोडे, अनिता अमृतकर, नाभिलास भगत आदी उपस्थित होते.