शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

हिंदू-मुस्लीम एकोप्यामुळे देश समोर जाईल

By admin | Updated: July 9, 2016 01:04 IST

विविध समाजाचे नागरिक आपल्या देशात एकोप्याने काम करीत आहेत. यामुळेच आम्हाला काम करताना फार त्रास होत नाही.

महामुनी : पोलीस स्टेशनच्या वतीने इफ्तार पार्टीमूल : विविध समाजाचे नागरिक आपल्या देशात एकोप्याने काम करीत आहेत. यामुळेच आम्हाला काम करताना फार त्रास होत नाही. असेच हिंदु- मुस्लीम समाजाचे संबंध कायम राहिल्यास देश पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, असे मत मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाबाराव महामुनी यांनी व्यक्त केले. ते मूल पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टीत बोलत होते.येथील पोलीस स्टेशनच्या पटांगणात घेण्यात आलेल्या इफ्तार पार्टीच्या अध्यक्षस्थानील मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे होते. प्रमुख अतिथी म्हणून जामा मस्जिदचे मौलाना मोहम्मद शमशेर रजा, हजरत अबू बकर सिद्धीकी मदरसा मूलचे मौलाना अब्दुल रऊफ मोहम्मद इब्राहिम, जामा मस्जीदचे मौजीम मौहम्मद तफशीर रजा, हजरत अबू बकर सिद्धीकी मदरसाचे अध्यक्ष वाजीद खान, जामा मस्जीद उपाध्यक्ष बबलू कुरेशी, सचिव गुलाब खाँ पठाण, अस्लामभाई, सलीम भाई, शक्कुरभाई, तालुका पत्रकार संघाचे सहसचिव गंगाधर कुनघाडकर, पत्रकार युवराज चावरे आदी उपस्थित होते.उपविभागीय पोलीस अधिकारी महामुनी म्हणाले की, मला आपल्या समाजासोबत जास्त काम करता आले नाही. परंतु जेवढे काम केले तो अनुभवही चांगला होता. गुन्हे जरी आपल्या काही बांधवावर दाखल झाले. परंतु जमानतदार हे संपूर्ण हिंदू होते. मूल तालुक्यात हिंदू-मुस्लीम अशी कधीच तक्रार नसल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर पिसे यांनी तर आभार अमलदार कुळमेथे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)ईदचे पुष्पगुच्छ देऊन स्वागतविरुर (स्टे.) : मुस्लिम धर्मियामध्ये पवित्र मानली जाणारी ‘रमजान ईद’ मोठ्या हर्षोल्लासात व बंधुभावाने साजरी करण्यात आली. सकाळपासून मुस्लिम बांधवांनी ईदच्या विशेष नमाजासाठी ईदगाहरवर गर्दी केली होती. शेकडो मुस्लिम बांंधवांनी या विशेष नमाज अदा केली. गावातील इदगाह समोर विरुर पोलीस ठाणे व नवयुवक उत्सव समिती विरुर यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. विरुरचे ठाणेदार श्याम गव्हाणे, सरपंच भास्कर सिडाम, उपसरपंच गुलाब ताकसांडे, दिलीप बेहरे, सुनील राऊत, वामन राठोड, ईदल राठोड, सचिन पडवे, व्यापारी अध्यक्ष संतोष ढवस, प्रशांत पवार, रवींद्र ताकसांडे, रवींद्र चांदेकर, गजानन ढवस, अविनाश रामटेके, भूपेंद्र बोढे, शाहु नारनवरे, श्रीनिवास ईलुदूरा यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देऊन भाईचाऱ्याचे वातावरण निर्माण केले आहे.