शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

आवास योजनेत चंद्रपूर महाराष्ट्रात अव्वल ठरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:46 IST

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या विविध योजनेतून सर्वाधिक घरे जनतेला मिळेल, यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी या योजनेच्या अंमलबजावणी व पाठपुराव्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, कोणत्याही परिस्थितीत आवास योजनेमध्ये चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक घरे बांधणारा जिल्हा झाला पाहिजे, यासाठी कामाला लागावे, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : २१ विभागांचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या विविध योजनेतून सर्वाधिक घरे जनतेला मिळेल, यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी या योजनेच्या अंमलबजावणी व पाठपुराव्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, कोणत्याही परिस्थितीत आवास योजनेमध्ये चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक घरे बांधणारा जिल्हा झाला पाहिजे, यासाठी कामाला लागावे, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये पालकमंत्री यांच्या नेतृत्वात २१ विविध विभागांवर बुधवारी चर्चा करण्यात आली. दुपारी १२ वाजता या चर्चेला सुरुवात करण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या योजनेवर प्रामुख्याने चर्चा झाली. या बैठकीत बोलताना ना. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील शहरे उत्तमरित्या पुढील काळात उभी राहावीत, यासाठी या आवास योजनेचा कल्पकतेने विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले.या बैठकीला आमदार नाना श्यामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त संजय काकडे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, स्थाई समितीचे सभापती राहुल पावडे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.सकाळच्या सत्रात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) याबाबत आढावा घेताना त्यांनी आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे व मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याशी चर्चा केली. शहरात मोठ्या प्रमाणात आवास योजनेतून घरे देताना नदीच्या पात्रातील नागरिकांचेदेखील पुनर्वसन महत्त्वाचे आहे. त्यामुळे चांगल्या जागेत घरे देण्यासाठी असणाऱ्या अडचणी व त्यासंदर्भात काय उपाययोजना करता येईल, यासाठी एका उच्चस्तरीय समितीचे गठण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यासंदर्भात लवकरच बैठक घेत असल्याचेसुद्धा सांगितले. याशिवाय कोणते आरक्षण हटवता येते या संदर्भातही अभ्यास करण्याबाबत अधिकाºयांना निर्देश दिले.कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करापोलीस सारथी योजनेचा आढावाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी घेतला. जिल्हाभरात शाळा-कॉलेजेमध्ये योग्य पद्धतीचा संदेश सर्वांना जाईल, अशी प्रचार यंत्रणा राबविण्याचे निर्देश दिले.गरज भासल्यास कॉल सेंटर आणखी उघडण्यात यावे, यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांच्या सुरक्षा संदर्भात अतिशय काटेकोरपणे या योजनेची अंमलबजावणी व्हावी, असे यावेळी त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांना सांगितले. शहरातील काही भागांमध्ये असामाजिक तत्त्वांचा टोळ्या स्टंटबाजी करण्यामध्ये सक्रिय झाल्याचे यावेळी अनेक समितीच्या सदस्यांनी लक्षात आणून दिले. यावर अशा घटकांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.