शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक औद्योगिक वीज शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 14:02 IST

कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशच्या तुलनेत वीज निमिर्तीच्या क्षेत्रात मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्राने आघाडी घेतली. मात्र, औद्योगिक वीज वापर शुल्कात कमालीची कपात करूनही महाराष्ट्राने सर्वाधिक वीज प्रशुल्क वसुल करण्याचे धोरण सुरूच ठेवले.

ठळक मुद्देलघु उद्योग क्षेत्रात नाराजी तीन राज्यांत शुल्क कपात

राजेश मडावीचंद्रपूर : कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशच्या तुलनेत वीज निमिर्तीच्या क्षेत्रात मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्राने आघाडी घेतली. मात्र, या चारही राज्यांनी औद्योगिक वीज वापर शुल्कात कमालीची कपात करूनही महाराष्ट्राने सर्वाधिक वीज प्रशुल्क वसुल करण्याचे धोरण सुरूच ठेवले. परिणामी, विशेषत: विदर्भातील लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.विदर्भ हा देशाचा प्रमुख वीज उत्पादक भूभाग आहे. महाराष् ट्रातील १० हजार १०० मेगावॅट स्थापित वीज क्षमतेपैकी विदर्भातील ५ हजार ६०० मेगावॅट (५५ टक्के ) योगदान आहे. मात्र, राज्यातील एकूण वीजवापर हे विदर्भातील २ हजार मेगावॅट म्हणजे १२.४ टक्केच्या तुलनेत तब्बल १६ हजार १४३ मेगावॅट आहे. वीज उत्पादनात अग्रेसर असूनही विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये उद्योग व घरगुती वीजेचा वापर राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यल्प आहे. परंतु, जुनेच औद्योगिक शुल्क धोरण कायम ठेवल्याने लघु व मध्यम उद्योगांवर मोठा आर्थिक भार निर्माण झाला. या धोरणांत बदल झाला नाही, विदर्भातील लघु व मध्यम उद्योगांना टाळे लावण्याची वेळ येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. विदर्भाची दरडोई वीज विक्रीतही महाराष्ट्राच्या सरासरी तुलनेत सतत घट होत असताना शुल्क धोरणाचा पूनर्विचार हा होऊ नये, असाही प्रश्न विचारला जात आहे. कोळसा खाणींवर नजर ठेवून खासगी कंपन्यांनी बँकांकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढून विदर्भात औष्णिक केंद्र सुरू केले. मात्र, विजेची मागणी घटल्याने या कंपन्यांनी स्वत: उभारलेल्या औष्णिक केंद्रांना आता सरकारने ताब्यात घ्यावे, हा तगादा करीत आहेत. तर दुसरीकडे अतिरिक्त औद्योगिक शुल्काचा बोजा वाढल्याने लघु व मध्यम उद्योग शेवटच्या घटका मोजत असल्याचे वास्तव पुढे येत आहे.राज्यनिहाय औद्योगिक वीज शुल्क आकारणीराज्य                    उच्च दाब                   कमी दाब (रुपये दर ताशी किलो वॅटमध्ये)महाराष्ट्र                   ७.३८                          ८.५०कर्नाटक                  ६.००                           ५.२५गुजरात                   ५.३०                          ५.५०आंध्र प्रदेश               ५.५०                         ५.७०मध्य प्रदेश               ६.००                          ८.८५

टॅग्स :mahavitaranमहावितरण