शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
3
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
4
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
5
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
6
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
7
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
8
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
9
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
10
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
12
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
13
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
14
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
15
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
16
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
17
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
18
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
19
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
20
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली

उच्च न्यायालयाचा जात पडताळणी समितीला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 1:11 PM

चंद्रपूर-आदिवासी माना जमातीच्या विद्यार्थिनीला जात वैधता पत्र देण्यास नकार देणाºया गडचिरोली येथील अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला चार आठवड्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतेच दिले आहेत.तेजस्विता ऋषी मुंढरे असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती मूल येथील रहिवासी आहे. ती अनुसूचित जमातीच्या यादीत ...

ठळक मुद्देचार आठवड्यात जात वैधता देण्याचे आदेशआदिवासी विद्यार्थिनीला मिळाला न्याय

चंद्रपूर-आदिवासी माना जमातीच्या विद्यार्थिनीला जात वैधता पत्र देण्यास नकार देणाºया गडचिरोली येथील अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला चार आठवड्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतेच दिले आहेत.तेजस्विता ऋषी मुंढरे असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती मूल येथील रहिवासी आहे. ती अनुसूचित जमातीच्या यादीत १८ व्या क्रमांकावर असणाºया माना या आदिवासी जमातीमध्ये येते. जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून गडचिरोली येथील अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीकडे प्रकरण दाखल केले. परंतु समितीने १३ मे २०१३ रोजी अनुसूचित जमाती असल्याचा दावा फेटाळत जात वैधता प्रमाणपत्र देण्यास नकार दिला.समितीच्या या निर्णयाला तेजस्विताने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले. खंडपीठाने तेजस्विताची याचिका दाखल करून घेत याचिका क्र. ६३३०/ २०१५ प्रकाश लाड विरुद्ध राज्य सरकार आणि याचिका क्र. ६६३१/ २०१४ तेजस्विनी ठाकूर विरुद्ध आदिवासी तपासणी समिती नाशिक अशा वेगवेगळ््या निर्णयांचा आधार घेऊन गडचिरोली येथील जात पडताळणी समितीचा दि. १३ मे २०१३ चा निर्णय रद्द ठरवला. तसेच चार आठवड्यांच्या आत तेजस्विताला जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश समितीला दिले. अशा घटना टाळण्यासाठी योग्य पावले उचलावीत असेही न्यायालयाने निकालात स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रीती राणे यांनी तर सरकारी वकील अ‍ॅड. लोखंडे यांनी बाजू मांडली.