वीज पडून मृत्यू : पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटपलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात ५ व १२ जून रोजी वीज पडून मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना पालकमंत्री सुधीर मुंगटीवार यांच्या हस्ते प्रत्येकी चार लाखांची मदत देण्यात आली आहे. त्यांनी इतर जखमींना तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. ना. मुनगंटीवार यांनी प्रत्यक्ष भेटून या नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंबीयांचे सांत्वन केले. वेंडली येथील प्रशांत आमटे यांचा ५ जून रोजी आणि लटारी वाडगुळे व वर्षा गाऊत्रे यांचा १२ जून रोजी वीज पडून मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबातील सोमा जानबा आमटे, रवींद्र लक्ष्मण गाऊत्रे, सुरेश लटारी वाडगुळे या वारसांना प्रत्येकी चार लाखांचा धनादेश देण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी या कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे सांगितले. तसेच वीज पडून जखमी झालेले राजू आदे, निषाद कावळे, सुनिता वाडगुळे, सोना आमटे यांचा समावेश आहे. त्यांनाही भरीव मदत करण्याचे निर्देश चंद्रपूरचे तहसीलदार संतोष खांडरे यांना दिले. विजेपासून संरक्षणासाठी प्रशासनाच्या उपायांचा अंमल करण्याचे आवाहन करण्यात आले.
नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंबातील वारसांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2017 00:48 IST