शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

पोळ्याची मारबत उठतेयं पळसाच्या जीवावर

By admin | Updated: September 9, 2015 00:56 IST

‘माशा मुरकुटे घेवून जा गे मारबत’ म्हणत तान्ह्या पोळ्याच्या दिवशी पळसाच्या फांद्या गावाच्या सीमेबाहेर नेवून मारबत ...

पळस संवर्धनासाठी आवाहन : सार्ड, श्रीसंगम, ज्ञानरंजनची जनतेला सादगोपालकृष्ण मांडवकर  चंद्रपूर‘माशा मुरकुटे घेवून जा गे मारबत’ म्हणत तान्ह्या पोळ्याच्या दिवशी पळसाच्या फांद्या गावाच्या सीमेबाहेर नेवून मारबत काढण्याची पूर्वापार परंपरा विदर्भात असली तरी, या परंपरेपायी लक्षावधी पळसांची होणारी कत्तल मात्र निसर्गाच्या दृष्टीने धोकादायक ठरली आहे. हजारो पक्ष्यांचे वस्तीस्थान असलेल्या आणि शेतकऱ्यांसाठी बहुपयोगी असलेल्या या पळसाच्या संवर्धनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत.सार्ड (सोशल अ‍ॅक्शन फॉर रूरल डेव्हलपमेंट), श्रीसंगम (श्री संत गमाजी महाराज विकास मंडळ, नंदोरी), ज्ञानरंजन चंदनखेडा या सामाजिक संस्थांसह चंद्रपूर वनविभाग आणि सामाजिक वनिकरण विभागाच्या माध्यमातून या विषयावर जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.या जनजागृतीचा एक भाग म्हणून या संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्रित येऊन ‘पळस बचाव अभियान’ उभारले आहे. या अंतर्गत नागरिकांच्या जनजागरणासाठी पत्रके प्रकाशित करून ती नागरिकांना वाटली जात आहेत. या सोबतच, ग्रामीण भागात गावकऱ्यांच्या सभा आयोजित करून पळसाची उपयोगिता पटवून दिली जात असून संवर्धनासाठी आवाहन केले जात आहे.विदर्भातील ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी सकाळी दारासमोर पळसाच्या फांद्या ठेवण्याची परंपरा आहे. या फाद्यांना वाक बांधून गृहिणीकडून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळ्याच्या दिवशी भल्या पहाटेलाच त्या पळसाच्या सर्व फांद्या उचलून ‘मारबत’ काढण्याची परंपरा आहे. ही मारबत काढणे म्हणजे ‘माश्या मुरकुटे घेऊन जा गे मारबत’ असे मोठ्याने ओरडण्याचा प्रकार असतो. त्या फांद्या एकमेकाएंवर ठोकत आणि ‘घेऊन जा गे मारबर’ म्हणत गावसीमेबाहेर अथवा परसदारातील खतावर त्या फांद्या नेवून फेकण्याची परंपरा आहे. आताच्या नव्या युगातही घराघरातून ही मारबत काढली जाते, मात्र त्यामागचे कारण कुणालाही माहीत नाही. तरीही परंपरेचा भाग म्हणून आजही या दिवशी पळसाच्या फांद्या आणून दारात ठेवल्या जातात. एका घरी साधारणत: आठ ते दहा फांद्या वापरल्या जातात. या हिशेबाने प्रत्येक कुटूंबात आणल्या जाणाऱ्या फांद्यांची संख्या गणली तर हा आकडा लक्षावधी झाडांवर संक्रांत आणणारा असल्याचे दिसेल. या परंपरेचा फायदा घेऊन शहरात तर अनेक जण ट्रॉली भरभरून पळसाच्या फांद्या आणतात आणि त्यांचा व्यापार करतात. नागरिकही परंपरेचे पालन करायला हवे म्हणून फांद्या विकत घेवून घरोघरी नेतात.