शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अतिवृष्टी! चंद्रपूर जिल्ह्यात संततधार सुरूच; नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 20:34 IST

Chandrapur News मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका चंद्रपूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. जिल्ह्यातील वर्धा, पैनगंगा, इरई, झरपट नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

ठळक मुद्देइरईचे सातही दरवाजे सव्वा मीटरने उघडलेइरईचे पाणी चंद्रपूर शहरात शिरले

चंद्रपूर : मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. जिल्ह्यातील वर्धा, पैनगंगा, इरई, झरपट नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बुधवारी सकाळपासून इरईचे धरणाचे सातही दरवाजे सव्वा मीटरने उघडल्याने इरई नदीचे पाणी चंद्रपूर शहरातील काही भागात शिरले. परिणामी नागरिकांना घर सोडावे लागले. नदीचे पाणी वाढत असल्याने पूरपरिस्थिती बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर-कोलगाव येथे वर्धा नदीच्या घाटावर पूल बांधण्यात येत आहे. या पुलाच्या कामावर असलेले सहा मजूर पुरात अडकल्याची माहिती मिळाली आहे.

अप्पर वर्धा, गोसीखुर्द, इरई धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा, वैनगंगा, इरई तसेच झरपट या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी नदीपट्ट्यातील शेकडो घरांत पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना घर सोडावे लागले. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार तसेच धरणातील पाणी सोडले जात असल्याने जिल्ह्यात पूरपरिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

चंद्रपूर शहरातील काही काॅलनीमध्ये पुराचे पाणी शिरत असल्याने रहमतनगर, सिस्टर काॅलनीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

रहमत नगर परिसरात सकाळपासून पाणी शिरत होते. त्यामुळे नदीकाठच्या अनेक कुटुंबीयांना प्रशासनाने हलविले असून सुरक्षितस्थळी पोहोचविले आहे.

या गावांना पुराचा वेढा

चंद्रपूर शहरातील सिस्टर काॅलनी, रहमतनगरसह बल्लारपूर तालुक्यातील चारगाव, हडस्ती, राजुरा तालुक्यातील कोलगाव तसेच सास्ती या गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे.

बसफेऱ्या प्रभावित

जिल्ह्यात आलेल्या पुराचा फटका एसटी महामंडळालाही बसला आहे. बुधवारी अनेक मार्गावरील बस फेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे प्रवासी अडकले. विशेषत: राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती या मार्गावरील बस बंद करण्यात आल्या.

वीजपुरवठा खंडित

चंद्रपूर शहरातील रहमतनगर, सिस्टर काॅलनी परिसरामध्ये इरई नदीचे पाणी शिरत असल्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पाणी चढत असल्याने नागरिकांनी घरातील साहित्य पॅकिंग करून घर सोडणेही सुरू केले.

सेल्फीसाठी नागरिकांची गर्दी

इरई नदी फुगली असून नदीचे पाणी अनेक काॅलनीमध्ये शिरत आहे. दरम्यान, इरई नदीच्या चंद्रपूर-दाताळा पुलावर नागरिकांनी बरीच गर्दी केली होती. अनेक जण मोठ्या प्रमाणात सेल्फी काढत असल्याने या पुलावर जत्रेचे स्वरुप आले होते.

राजुरा, कोरपना,चंद्रपूर, भद्रावती, पोंभूर्णा तालुक्याला फटका अधिक

जिल्ह्यात सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, चंद्रपूरसह राजुरा, कोरपना, भद्रावती,जिवती, पोंभूर्णा मूल या तालुक्यांना अधिक फटका बसला आहे. या तालुक्यात शेतीसह घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.

या नद्यांना पूर

वर्धा, इरई, झरपट,पैनगंगा,

अफवांवर विश्वास ठेवू नका : प्रशासन

कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नये. नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात, इमारतीत आश्रय घेऊ नका. पुलावरून नदी नाल्याचे पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरू नका.

येथे करा संपर्क

घडलेल्या घटनेची आपत्तीची माहिती तत्काळ जिल्हा तसेच तालुका नियंत्रण कक्षाला द्यावी. यासाठी चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या ०७१७२-२५१५९७ या क्रमांकावर नियंत्रण कक्षात संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अजय गुल्हाने आणि निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी केले आहे.

टॅग्स :floodपूर