शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा उडाला बोजवारा

By admin | Updated: August 19, 2015 01:18 IST

सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि नियमित आरोग्यसेवा पुरविण्याच्या उदात्त हेतूने शासनाने दुर्गम भागात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली.

चंद्रपूर: सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि नियमित आरोग्यसेवा पुरविण्याच्या उदात्त हेतूने शासनाने दुर्गम भागात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली. मात्र या केंद्राना आता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुशेषांचे ग्रहण लागल्याचे दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्यात अशा डॉक्टरांची तब्बल ३९ पदे रिक्त असल्याने संपूर्ण जिल्हाभर आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.जिल्ह्यात आजघडीला एकूण ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र अस्तित्वात आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात दोन या प्रमाणे ११६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात मात्र अवघे ७७ डॉक्टर कार्यरत आहेत. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी यांचाही समावेश आहे. रिक्त असलेल्या ३९ डॉक्टरांपैकी २० जण हे पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी गेलेत. तर तीन डॉक्टरांवर विविध आरोप असल्याने त्यांना जिल्हा कार्यालयाशी संलग्न करण्यात आले.त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. दुसरीकडे डॉक्टरांच्या या अनुशेषामुळे रुग्णांना तत्काळ उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे. परगावाहून येणाऱ्या डॉक्टराची वाट पाहून थकल्यानंतर रुग्णांना खासगी रुग्णालयाची पायरी चढावी लागत आहे. कोरपना या आदिवासीबहुल तालुक्यात तर आरोग्य सेवेची मोठी दैनावस्था दिसून येते. या तालुक्यात नारंडा, विरुर (गाडेगाव) आणि मांडवा असे तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यापैकी नारंडा येथील नियमित वैद्यकीय अधिकाऱ्याने चार महिन्यांपूर्वी राजीनामा दिला तर दुसरा वैद्यकीय अधिकारी बऱ्याच दिवसांपासून दिर्घ रजेवर आहे. त्यामुळे वनसडी येथील आयुर्वेदीक दवाखान्यातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याकडे नारंडाचा प्रभार सोपविण्यात आला. परिणामी वनसडीचे आयुर्वेदीक रुग्णालय आता कुलूप बंद अवस्थेत आहे. दुसरी बाब म्हणजे प्रभार दिल्यानंतरही त्यांच्याकडे वित्तीय अधिकार नसल्याने सुमारे अडीच महिन्यांपासून नारंडा केंद्रातील सर्वच कर्मचाऱ्यांचे वेतन अडले आहे.मांडवा आरोग्य केंद्रातील एक डॉक्टर आरोग्य सेविकेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात अडकल्याने त्याला मुख्यालयाशी जोडण्यात आले. त्यामुळे या आरोग्य केंद्रात शुकशुकाट पसरल्याने अखेर पारडी आणि कोडशी येथील आयुर्वेदीक दवाखाने बंद करुन त्या दोघांची मांडवाला सेवा घेणे सुरु आहे. येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे जिवती तालुक्याचा आधीच प्रभार असताना आता नव्याने मांडवाचाही प्रभार देण्यात आला, तर मांडवाच्या एका डॉक्टरकडे नारंडा केंद्रातील वित्तीय अधिकारी सोपविण्यात आले. एकंदरी एकाच डॉक्टरला ५० किमी अंतरावरील दोन केंद्रात फिरस्तीवर दाखविण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र एकाच ठिकाणाहून सारे सुरु आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने तालुक्यात साथीचे तुरळक आजार वाढले आहेत. ही लागण अधिक उद्भवण्याची परिस्थिती असताना तालुक्यात मात्र डॉक्टरांची वाणवा प्रकर्षाने जाणवू लागली आहे. (प्रतिनिधी)