मतिमंद १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांचीही जबाबदारी संस्थेवर आहे. त्यामुळे शासनाने अनुदान द्यावे, या मागणीसाठी २५ जानेवारीपासून विद्यार्थ्यांसह संस्थेचे पदाधिकारी पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, गुरुवारी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी, तसेच जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली; मात्र विषय सुटला नाही. त्यामुळे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे. आता उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे. संस्थेला शासनाने मान्यता दिली. विद्यार्थीही सुपूर्द केले आहे. मात्र, अनुदान देत नसल्याने संस्था चालविणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करा नाही तर अनुदान द्या या मागणीसाठी संस्थेचे अध्यक्ष, तसेच सचिव पुरुषोत्तम चौधरी यांनी उपोषण सुरू केले आहे. अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघाला नसल्याने उपोषण सुरूच ठेव्याचा निर्धार संस्थेचे पुरुषोत्तम चौधरी यांनी केला आहे.
उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST