शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्र औषधीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 22:44 IST

सध्या पावसाळा सुरू असून विविध आजारात वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने जलजन्य आजाराची अनेकांना लागन होत आहे. त्यामुळे अनेकजण रूग्णालयात धाव घेत आहेत. मात्र औषधसाठाच उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्र, आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णांलयांमध्ये सर्दी, खोकल्याचीही गोळी मिळत नसल्याने रोष आहे.

ठळक मुद्देरूग्णांना नाहक त्रास : सर्दी, खोकल्याचीही गोळी मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या पावसाळा सुरू असून विविध आजारात वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने जलजन्य आजाराची अनेकांना लागन होत आहे. त्यामुळे अनेकजण रूग्णालयात धाव घेत आहेत. मात्र औषधसाठाच उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्र, आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णांलयांमध्ये सर्दी, खोकल्याचीही गोळी मिळत नसल्याने रोष आहे.वातावरणाच्या बदलाने जिल्ह्यातील अनेक भागांत तापाची साथ पसरली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा रुग्णालये सध्या रुग्ण उपचारासाठी येत आहेत. मात्र, सर्दी, ताप, खोकल्याचा औषधसाठाच केंद्रात नाही. रुग्णांच्या रोषाला वैद्यकीय अधिकारी बळी पडत आहे. साथरोगाच्या दिवसांतच औषधे नसल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालआ आहे.जिल्ह्यात ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३३९ आरोग्य उपकेंद्र, नऊ फिरते पथक, १० आयुर्वेद रुग्णालये आहेत. या रुग्णालयात अनेक औषधे नाहीत. दोन वर्षांपासून औषधे पुरविण्याची जबाबदारी एका खासगी कंपनीला दिलेली आहे. ही कंपनी मागणीनुसार औषधांचा पुरवठा प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालयांना करीत आहे. राज्यभरात ही कंपनी औषधांचा पुरवठा करीत आहे. आता औषधांचा पुरवठा करणे या कंपनीला जड जात असल्याचे दिसून येते.वातावरणाच्या बदलामुळे सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, हगवण, उलट्या अशा आजारांनी नागरिक बेजार आहेत. त्यावरील औषधेही सध्या रूग्णांलयांमध्ये उपलब्ध नाहीत. सर्दी, खोकल्यावरील सिपीकजीन्स व सीकोडॅक्झीन ही साधी औषधेही नाहीत.तापाच्या रूग्णासाठी पॅरेसिटमेल टॅबलेटही अनेक रुग्णालयांत नाही. शरीरात पाणी टिकवून ठेवण्याचे काम करणारे ओआरएस पावडरही सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांच्या रोषाला वैद्यकीय अधिकाऱ्यांना बळी पडावे लागत आहे.क्षयरोग व उच्चदाब तपासणी बंदराज्य शासनाच्या माध्यमातून २०१२ मध्ये राष्ट्रीय असंसर्गजन्य कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमातून ग्रामीण भागात क्षयरोग, उच्चदाब रुग्णांची नियमितपणे तपासणी सुरू करण्यात आली. तेव्हा आवश्यक ती औषधे देण्यात येत होती. मात्र मागील काही महिन्यांपासून ही तपासणी बंद आहे. शुगर तपासणीही बंद करण्यात आली असून तपासणी करताना आवश्यक असलेल्या ग्लुकोस्ट्रीप अनेक रुग्णालयांत उपलब्ध नाही. प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीनंतर महिलांना कॅल्शिअमच्या गोळ्या दिल्या जातात. मात्र, त्याही अनेक रूग्णालयात उपलब्ध नाहीत.औषध पुरवठ्याचे काम मुंबईच्या हॉपकीन कंपनीला देण्यात आले आहे. जिल्ह्यात काही आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा असेल. मात्र लवकरच ही परिस्थिती सुधारेल व रूग्णांना औषधे मिळतील.- डॉ. सतीश गोगुलवारजिल्हा आरोग्य अधिकारी.