शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रातच गर्भवती महिला वेदनेने होती विव्हळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:18 IST

जिवती शहरात आरोग्य सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र येथे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा दवाखान्यात रुग्ण गेले तर तेथे डॉक्टर वा कर्मचारी हजर राहत नसल्याने रुग्ण आपल्या वेदना घेऊन ताटकळत असतात.

ठळक मुद्देडॉक्टर नाही अन् कर्मचारीही नाही : जिवती आरोग्य केंद्र रामभरोसे

संघरक्षित तावाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : जिवती शहरात आरोग्य सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र येथे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा दवाखान्यात रुग्ण गेले तर तेथे डॉक्टर वा कर्मचारी हजर राहत नसल्याने रुग्ण आपल्या वेदना घेऊन ताटकळत असतात. बुधवारी अशीच घटना घडली. दवाखान्यात कुणीच नसल्याने एका गर्भवती महिलेला तासभर वेदनेने विव्हळत ताटकळत रहावे लागले.बुधवारी सायंकाळी जिवतीवरून ११ किमी अंतरावरील लांबोरी गावातील २४ वर्षीय वंदना तुळशीदास गोरगे ही चार महिन्यांची गर्भवती महिला पोटात वेदना होत असल्याने जिवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आली. परंतु तिथे डॉक्टर किंवा अन्य कोणताही कर्मचारी हजर नव्हता. डॉक्टर, आरोग्यसेविका, कंपाऊंडर, चपराशी कोणीही हजर नसल्याने सदर महिला वेदनेने तिथेच तासभर विव्हळत राहिली. काही वेळाने तिथे लोक जमा झाले. त्यांनीही संपर्क साधला. परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा फोन बंद असल्यामुळे बोलणे झाले नाही. त्याच दवाखान्यात कंत्राटी फिरते डॉक्टर असलेले डॉ. कुलभूषण मोरे यांच्याशी संपर्क साधून बोलविण्यात आले. त्यांनी तपासणी करून सदर गर्भवती महिलेला तत्काळ गडचांदूरला रेफर करावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर सदर महिला गडचांदूर व नंतर चंद्रपूरला रेफर करण्यात आले.सदर महिला एक तासापासून जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात वेदनेने विव्हळत होती. मात्र या तासाभरात दवाखान्यात कुणीही कर्मचारी फिरकला नाही. या केंद्रात जे मदतनीस पुरुष आहेत ते नेहमी दारूच्या नशेत असतात. जिवती हे तालुक्याचे ठिकाण असतानाही येथे वैद्यकीय अधिकारी राहत नाहीत. या ठिकाणी यायलाही अधिकारी घाबरतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.ही पदे आहेत रिक्तजिवती हे तालुक्याचे ठिकाण आहे. परंतु येथे अजूनही प्राथमिक आरोग्य केंद्रच अस्तित्वात आहे. जिवतीसाठी आता ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले असून त्याचे बांधकाम सुरू आहे. येथे ४० हजार लोकसंख्येसाठी एकच वैद्यकीय अधिकारी असून यामुळे रुग्णाकडे दुर्लक्ष होत आहे. येथे एक वैद्यकीय अधिकारी, तीन आरोग्य सेवक, एक आरोग्य सेविका हे पद रिक्त आहे. प्रशासनाने रिक्त पदे भरावी, अशी मागणी होत आहे.बुधवारी आॅडिट असल्यामुळे मी जिवती बाहेर होतो. गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी द्या, ही मागणी शासनाला केली आहे. पण याकडे दुर्लक्ष होत आहे. रिक्त असलेले वैद्यकीय अधिकारी पद भरले तर रुग्णांची गैरसोय होणार नाही.- डॉ. आर. पी. अनखाडेवैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र, जिवती

टॅग्स :Healthआरोग्य